एरवी लग्नकार्यात किंवा प्रवासात वापरात येणारी प्लास्टिक बाटली, थंडपेयांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, धुण्याच्या पावडरची पिशवी.. हा तसा पर्यावरणासाठी चिंतेचा विषय. यामुळे होणारे प्रदूषण अनेकांची डोकेदुखी ठरली, तर काहींसाठी नवनिर्मितीचा ध्यास. शहरातील मंगला धोंगडे यांनी ‘वापरा आणि फेकून द्या’ या तत्त्वावर वापरल्या गेलेल्या रिक्त प्लास्टिक बाटल्यांपासून आकर्षक सजावटीच्या वस्तू, महिलांचे आभूषणे, विज्ञान प्रदर्शनात वापरली जाणाऱ्या विविध प्रतिकृती तयार केल्या आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध प्रकल्प तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आगामी काळात ही कला अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावी, यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
िदडोरी रस्त्यावर वास्तव्यास राहणाऱ्या मंगला विजय धोंगडे यांना सुरुवातीपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याची आवड आहे. त्यांच्या या आवडीला २०१० मध्ये भरलेल्या बाल महोत्सवाने वेगळा आयाम दिला. ‘टाकाऊतून टिकाऊ, पण काही तरी हटके’ या संकल्पनेवर त्यांना महोत्सवातील प्रदर्शनात एक गाळा देण्यात आला. भरतकाम, रुखवतातील काही सामान तयार करण्याचे कसब  सलेल्या धोंगडे यांनी ‘हटके’ म्हणजे नेमके काय, यावर लक्ष केंद्रित केले. समोर दिसलेली रिकामी प्लास्टिकची बाटली हाती घेऊन त्यांनी यापासून काही वेगळे तयार करता येईल याचा विचार सुरू केला. सुरुवातीला हातातील बाटली अर्धी कापून त्याचे ‘पेन स्टॅण्ड’ तयार केले. त्याला सजावट म्हणून स्पार्कलचा वापर केला. उरलेल्या बाटलीला त्यांनी फुलाचा आकार दिला. त्यांच्या अखंड प्रयत्नांतून ३२ हून अधिक प्रकारची विविध आकर्षक रंगसंगतीतील फुले, वेगवेगळ्या आकारातील पान, राख्या, तोरण, महिलांची आभूषणे त्यांनी तयार केली.
आभूषणांमध्ये नेकलेस, बिंदी, बांगडी, कानातले, बाजूबंद आदींचा समावेश आहे. याशिवाय डायनिंग सेट, लहान-मोठय़ा आकारातील फुलांच्या परडय़ा, गुढी, फेकून दिलेल्या सिडीवर आकर्षक वॉलपीस अशा असंख्य वस्तू त्यांनी कल्पकतेने निर्मिल्या आहेत. या अनोख्या वस्तू निर्मितीच्या प्रवासात त्यांचे पती डॉ. विजय धोंगडे, मुलगी गीतांजली यांचे सहकार्य लाभल्याचे धोंगडे यांनी सांगितले. रिकामी बॉटल, फेव्हिकॉल, सर्जिकल कात्री आणि स्पार्कल कलर, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या, कुंदन, लेस अशा काही सजावटीच्या सामानातून आपण कसलीही प्रतिकृती सहज करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना आहे. कलेचा वारसा त्यांच्या मुलीनेही जपला असून ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत जावी यासाठी शहर परिसरातील शाळा, आश्रमशाळांमध्ये त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू असतात. नजीकच्या काळात मतिमंद, गतिमंद तसेच गरजू मुलांसोबत काम करत त्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  दुसरीकडे, पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी बागेतील कचऱ्यांपासून ‘पांडुरंग’चूल तयार केली आहे. त्याचा सध्या अभ्यास सुरू आहे. तसेच शाळांसाठी एका अभिनव प्रयोगाची आखणी धोंगडे करत आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?