बारावी विज्ञानाची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती मिळावी यासाठी ‘मराठी विज्ञान परिषदे’ने ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘मूलभूत विज्ञानात उच्चशिक्षणाच्या संधी’ या माहिती वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना मूलभूत विज्ञानातील संधींची ओळख करून दिली जाणार आहे. या माहिती वर्गाचे उद्घाटन शनिवार, ५ एप्रिल रोजी ‘निसकॉम’चे माजी संचालक डॉ. बाळ फोंडके यांच्या बीजभाषणाने होणार आहे. यावेळी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान भौतिकशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी २.३० ते ५.३० या वेळात पार पडणार आहे.
तीन दिवसीय माहितीवर्गाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० यावेळात रसायन तंत्रज्ञान संस्थेतील विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र भणगे हे रसायनशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर सोमवार ७ एप्रिल रोजी वझे महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. सिद्धिविनायक बर्वे वनस्पतीशास्त्र या विषयावर तर कीर्ती महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख डॉ. नंदिनी देशमुख या प्राणीशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा तीन दिवसीय माहिती वर्ग मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी येथे पार पडणार आहेत. या माहिती वर्गास प्रथम नोंदणी करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
इच्छुकांनी विज्ञान परिषदेच्या चुनाभट्टी येथील कार्यालयात ०२२-२४०५४७१४ किंवा ०२२-२४०५७२६८ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधवा.