इतर वेळी अगदी लाजाळू वाटणाऱ्या, स्वतचे अन्न स्वत: तयार करणाऱ्या आणि माणसांना उपयोगी पडणारा ऑक्सिजन हवेत सोडणाऱ्या वनस्पती आपल्या नियमित परिचयाच्या आहेत. पण अन्नासाठी थेट प्राण्यांना गिळंकृत करणाऱ्या कीटकभक्षी वनस्पतीही जगाच्या पाठीवर आहेत. अगदी भारतात आणि पश्चिम घाटावरही आहेत. आतापर्यंत केवळ हॉलीवूडपटातून किंवा फार तर पाठय़पुस्तकातून दर्शन देणाऱ्या या वनस्पती मुंबईकरांना पाहता येणार आहेत. रोझ सोसायटी ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या वनस्पती व गुलाब प्रदर्शनात पहिल्यांदाच तीन कीटकभक्षी वनस्पती पाहता येतील.
दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात माणसांनाही खाणाऱ्या मांसाहारी वनस्पती असल्याचे चित्रण चित्रपटांमधून झाले असले तरी वनस्पतीशास्त्रज्ञांना मात्र अजूनपर्यंत अशा वनस्पतीचा शोध लागलेला नाही. मात्र किडे, कीटक यांना आकर्षति करून त्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या वनस्पतींच्या अनेक जाती आहेत. काही ठिकाणी या वनस्पतींना गोगलगाय व बेडूक यांचाही समाचार घेतल्याच्या नोंदी झाल्या आहेत. या वनस्पती प्रामुख्याने उंच डोंगरमाथ्यावर, भरपूर पावसाच्या प्रदेशात आढळतात. पावसामुळे डोंगरमाथ्यावरील जमिनीची झीज होते. त्यातील बरेचसे क्षार विरघळून जातात. त्यामुळे तगून राहण्यासाठी या वनस्पतींना क्षारासाठी बाहेरचा स्रोत शोधावा लागतो. तग धरून राहण्यासाठी या वनस्पतींनी स्वत:मध्ये बदल करून घेतला. अशा वनस्पती भारतात मेघालय, पश्चिम घाट अशा भरपूर पावसाच्या प्रदेशांमध्ये आढळतात. या वनस्पतींच्या पानांचा आकार मध्ये खोलगट असल्याने त्यांना घटपर्णी म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मासाठी नोंद असलेली चित्रक ही वनस्पतीही कीटकभक्षी आहे. पांढऱ्या व निळ्या रंगांची फुले येणाऱ्या या वनस्पती पश्चिम घाटात आढळतात. अशाच कीटकभक्षी प्रकारातील तीन वनस्पती प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक आणि मुंबई रोझ सोसायटीचे सदस्य अविनाश कुबल यांनी दिली.
प्रदर्शनातील वनस्पती
* व्हिनस फ्लायट्रॅप – इंच ते दीड इंच लांबीचे पान असलेल्या या वनस्पतींची उंची अवघी तीन ते चार इंच असते. या वनस्पतीच्या पानांचा आकार शिंपल्यासारखा असतो. पानांच्या मधल्या भागात चिकट स्राव आढळतो. त्या स्रावाला सुवास असल्याने कीटक त्याकडे आकर्षति होतो. कीटक स्रावात अडकला की उडण्याची धडपड करतो. त्याच्या स्पर्शाने लाजाळूप्रमाणे ही वनस्पती पान मिटून घेते. या पानांमधून स्रवणाऱ्या द्रावात हा कीटक विरघळला जातो व हा रस पानांमध्ये शोषला जातो. लहान कोळी, मुंग्या, कीटक, ढेकूण असे प्राणी या वनस्पतीचा आहार आहेत. ही वनस्पती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना, साउथ कॅरोलिना या भागात आढळते. भारतात मेघालयात ही वनस्पती आहे.
* ट्रॉपिकल पिचर प्लाण्ट – ही वनस्पती मादागास्कर, श्रीलंका, फिलिपिन्स, सुमात्रा आणि मेघालयातही सापडते. या वनस्पतीच्या पानांचा आकार लांबट गोल नळीसारखा असतो. या नळीच्या तळाला पाण्यासारखा स्वादिष्ट द्रव असतो. या रसाच्या आशेने आलेला कीटक त्यानंतर वनस्पतीचे भक्ष बनतो. भारतातील वनस्पतीचा रंग हिरवट असतो आणि ती चार ते साडेचार इंचापर्यंत वाढते.
* अमेरिकन पिचर प्लाण्ट – आमेरिकेत आढळणारी ही वनस्पती अकरा इंचापर्यंत वाढते. काही त्यापेक्षाही मोठय़ा होतात. गोळ नळीसारखाच आकार असला तरी त्याला हिरव्यासोबत लाल रंगाची जोड असते. या वनस्पतीचा आकारही ट्रॉपिकलपेक्षा मोठा असतो.

कुठे.. कधी..
इंटरनॅशनल एअरपोर्ट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हे प्रदर्शन १७ व १८ जानेवारी रोजी अंधेरी पूर्व येथील सहार रस्त्यावरील विमानतळ कॉलनीच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी होत असलेल्या सर्वोत्तम गुलाब स्पध्रेत भाग घेण्यासाठी देशातील २५ ठिकाणांहून स्पर्धक आले आहेत. याशिवाय फुलांची मांडणी, सजावट विविध प्रकारची रोपे यांची मांडणीही प्रदर्शनात पाहता येईल.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ