२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आगमन होत असून यंदा गौरींसह गणेशाचा मुक्काम सात दिवसांचा आहे. मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी ६.०८ पर्यंत अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी आणाव्यात, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
बुधवार, ३ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१६ पर्यंत मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करावे, असाही सल्ला सोमण यांनी दिला आहे.
मंगळवार असला तरीही पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन याच दिवशी करावे, असेही सोमण यांनी म्हटले आहे.