‘इग्नू’च्यावतीने प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते पदव्युत्तपर्यंतची २५० अभ्यासक्रम सुरू केली असून त्यात फ्रेंच भाषेसंदर्भातील आणखी एका अभ्यासक्रमाची भर पडणार आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) इतर सेवाभावी संघटनांच्या मदतीने नियमितपणे वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असून इच्छुक लोकांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत. विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात असून अद्ययावत ज्ञान, कौशल्य आणि शैक्षणिक पात्रतेविषयी तडजोड न करता इग्नूचे ज्ञानदान सुरू आहे. भारतात ६.७ टक्के पदवीधर असून ९३.३ टक्के लोकांचे पदवीपेक्षा कमी शिक्षण आहे. त्यासाठी दूरशिक्षण चांगला पर्याय इग्नूद्वारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. इग्नूच्या प्रयासामुळेच कारागृहातील कैदी आणि गडचिरोलीतील आदिवासींपर्यंत शिक्षण पोहचू शकले. प्रादेशिक कार्यालयाने ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचण्यास विशेष प्रयत्न केले. भारतीय वायू सेना मेंटेनन्स कमांडच्या सहभागाने इग्नू नागपूरच्या प्रादेशिक केंद्राच्यावतीने वायू सेना पत्नी कल्याण असोसिएशनच्या सदस्यांसाठी जागृती सभा घेण्यात आली. त्यासाठी विशेष प्रवेश शिबीर येत्या २९ एप्रिलला आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून अभ्यास साहित्य आणि ओळखपत्र ताबडतोब दिले जातील, अशी माहिती प्रादेशिक केंद्राचे संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी पत्रकार परिषदेत दिली. इग्नूच्या प्रयत्नांतून पाच व्यावसायिक सेक्स वर्करने याठिकाणी प्रवेश घेतला आहे. गंगाजमूना भागात इग्नूच्यावतीने शिक्षण घेण्यासंबंधी समुपदेशन करण्यात येणार आहे.
इग्नूच्यावतीने प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते पदव्युत्तपर्यंतची २५० अभ्यासक्रम सुरू केली असून त्यात फ्रेंच भाषेसंदर्भातील आणखी एका अभ्यासक्रमाची भर पडणार आहे. येत्या जुलैपासून फ्रेच भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना घेता येईल. हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून त्यात प्रात्यक्षिकही असेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचा उपयोग चांगल्या संधी हुडकण्यासाठी निश्चित होईल, अशी आशा डॉ. पी.शिवस्वरूप यांनी व्यक्त केली.  ४ हजार ८०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. त्यात फ्रेंच भाषा आणि प्राथमिक संवाद कौशल्य विकसित करण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जून आहे. पत्रकार परिषदेत डॉ. व्ही.के. डुबुले, डॉ. विकास सिंघल, डॉ. नुरूल हसन आदी इग्नूची मंडळी उपस्थित होती.