जगात सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम जवळपास २००० हून अधिक व्यक्तींच्या नावावर आहे. मात्र, इतिहासातील सर्वात कठीण ‘रेस अक्रॉस अमेरीका’ (RAAM) ही सायकल स्पर्धा आजवर जेमतेम २०० सायकलस्वारांनाच पूर्ण करता आली आहे. यावरूनच या स्पध्रेसाठी लागणारी कसोटी लक्षात येईल. अशा या खडतर स्पध्रेसाठी अलिबागचा मराठमोळा सुपुत्र सुमित पाटील हा २८ वर्षीय तरूण पात्र ठरला आहे. हा मान मिळवणारा  सुमित केवळ तिसरा भारतीय आहे. मात्र आधीच्या दोघांना ही स्पर्धा पूर्ण करता आलेली नाही, त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय होण्याचा आपला मानस असल्याचा विश्वास सुमितने ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केला.
गेल्या चार वर्षांत सुमितने सायकल सराव करताना ५० हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर बीआरएम स्पर्धामध्ये भाग घेताना ५४०० किलोमीटर सायकल चालवली आहे. ‘डेझर्ट -५००’ आणि ‘अल्ट्रा बॉब’सारख्या अतिउष्ण प्रदेशात सायकल चालवण्याच्या स्पर्धाचाही अनुभव सुमितच्या गाठीशी आहे. विशेष म्हणजे, आजवर सुमितने सायकलवर पार केलेले सर्व अंतर मोजल्यास ते अंतर एका जगप्रदक्षिणेहूनही अधिक भरेल.
सुमित २००१ पासून मुंबईत प्रभादेवी येथे राहतो.  रूईया महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर सुमितला लष्करात जाण्याची इच्छा होती. मात्र, अचानक झालेल्या अपघाताने त्याची संधी हुकली. तरीही यूपीएससीच्या माध्यमातून लष्करी सेवेत जाण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अद्याप कायम आहे.
लहानपणापासूनच स’ाद्रीच्या कुशीत भटकणारा सुमित सध्या सायकलिंग करणा-या अनेकांचे प्रेरणास्थान आहे. फक्त सायकल चालवणे नव्हे तर सायकलिंगशी निगडित प्रत्येक गोष्टीचा सुमितचा दांडगा अभ्यास आहे. स्पध्रेमध्ये उतरल्यावर ती स्पर्धा सगळ्यांआधी पूर्ण करणाराच फक्त विजेता नसतो, तर ती स्पर्धा पूर्ण करणारा प्रत्येकजण विजेता असतो, असं सुमितचं म्हणणं आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर शरीर तुमची कसोटी पाहत असतं आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या मेंदूशी खेळायला लागता. तुम्ही जितका वेळ मेंदूशी खेळू शकाल तितका लांबचा पल्ला तुम्ही गाठू शकता, असं सुमितचं लाडकं तत्त्वज्ञान आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमितचे वडील आरसीएफमध्ये नोकरीला असून, आई टपालखात्यात आहे. सुमितला संगीताची उत्तम जाण असून, तो उत्तम बासरीवादकही आहे.
 आíथक मदतीचे आवाहन
स्पध्रेच्या सलग १२ दिवसांच्या कालावधीत सोबत एक व्हॅन, मदतनीसांची टीम, सायकली, त्यांचे पार्ट्स, राहण्या-जेवणाची व्यवस्था हा सर्व खर्च जवळपास ५० लाख रुपयांच्या घरात जाणार आहे. हा सर्व खर्चस्वबळावरच उभा करावा लागणार आहे. स्पर्धेत उतरण्यासाठी‘टीम अग्नी’ ची स्थापना करण्यात आली असून सुमितला आवश्यक ते सहाय्य या टीमतर्फे पुरविण्यात येत आहे. इच्छुक व्यक्ती  http://www.sumitpatil.com या संकेस्थळावर जाऊन सुमितला स्पर्धेसाठी आर्थिक हातभार लावू शकतात.