चंद्रावर चाललेला पहिला अवकाशवीर कोण म्हटल्यानंतर, नील आर्मस्ट्राँग हे उत्तर लगेच येते; पण शेवटचा चांद्रवीर कोण, असे विचारले तर फारसे कुणाला सांगता येणार नाही. त्याचे नाव युजीन सेरनन; त्यांचे नुकतेच निधन झाले. जेमिनी ९ ए, अपोलो १० व अपोलो १७ अशा तीन मोहिमांत ते चंद्रावर जाऊन आले होते. जेमिनी मोहिमेत त्यांनी स्पेस वॉकही केले होते. नौदलाचे वैमानिक, विद्युत अभियंता व १९७२ मध्ये चंद्रावर चालणारा अखेरचा माणूस ही त्यांची ओळख. जेमिनी अवकाश मोहिमेत त्यांना अमेरिकेच्या वतीने पहिले स्पेसवॉक करण्याची आव्हानात्मक कामगिरी करता आली.

houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
Road accident in Dindori
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरुन परत येताना अपघात; १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू
Mohammad Rafis 153 songs in 16 hours singer Santosh Kapares world record
१६ तासांत मोहम्मद रफी यांची १५३ गाणी, गायक संतोष कपारे यांचा जागतिक विक्रम
Yashasvi Jaiswal luxury home
तंबूतून टॉवरपर्यंत! यशस्वी जैस्वालची गगनभरारी; मुंबईत घेतलं ५ कोटींचं घर!

सेरनन यांचा जन्म १४ मार्च १९३४ रोजी इलिनॉइसमधील शिकागो येथे झाला. त्यांचे वडील स्लोवाक तर आई झेक वंशाची होती. मेवूड येथील प्रोव्हिसो ईस्ट हायस्कूलमधून ते पदवीधर झाले व नंतर विद्युत अभियांत्रिकीत पदवी घेतली. परडय़ू विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नंतर नौदलात वैमानिक बनले. हवाई अभियांत्रिकीतही त्यांनी नौदलाच्या संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतली होती. १९६३ मध्ये ते नासात आले. जेमिनी ९ मोहिमेत त्यांची पर्यायी संघामध्ये निवड झाली होती, पण ऐन वेळी मुख्य संघातील अवकाशवीर दुर्घटनेत मरण पावले. त्यामुळे सेरनन यांना पुढे होऊन चांद्रमोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

चंद्रावर एकूण १२ जण जाऊन आले. त्यात दोनदा चंद्रावर प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेणारे सेरनन हे एकमेव. विशेष म्हणजे चंद्रावर पहिले पाऊल   ठेवणारे नील आर्मस्ट्राँग व शेवटचे पाऊल ठेवणारे सेरनन दोघेही परडय़ू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. १९७६ मध्ये सेरनन नौदल व नासा येथून निवृत्त झाले. एबीसी न्यूजच्या गुड मॉìनग अमेरिका या सकाळच्या कार्यक्रमात ते सहभागी असत. त्यांच्या आठवणी ‘द लास्ट मॅन ऑन द मून’ या पुस्तकात शब्दबद्ध आहेत. त्या पुस्तकाचे सहलेखक आहेत डोनाल्ड डेव्हिस. ‘इन द श्ॉडो ऑफ द मून’ हा माहितीपट त्यांच्यावर काढण्यात आला. नंतर त्याच नावाने त्यांनी पुस्तकही लिहिले. डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्यावर ‘व्हेन वुई लेफ्ट अर्थ, द नासा मिशन्स’ हा लघुपट काढला, तर एचबीओने काढलेल्या ‘फ्रॉम द अर्थ टू मून’ या लघुपटास एमी पुरस्कार मिळाला होता. ‘द स्काय अ‍ॅट नाइट’ या बीबीसीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. ‘इंटरनॅशनल स्पेस हॉल ऑफ फेम’सह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.

सेरनन यांचे त्यांची मुलगी ट्रेसीवर निरतिशय प्रेम होते, त्यातूनच त्यांनी चंद्रावरील मातीत तिचे नाव कोरले. तेथील दगडावर त्यांनी तिचे नाव कोरले हे मात्र खरे नाही. अवकाशवीर अ‍ॅलन बीन यांनी एक चित्र काढले आहे; त्यात अपोलो मोहिमेचा संघ एका मोठय़ा खडकाजवळ दाखवला असून त्यात ट्रेसीज बोल्डर नावाचा खडक असून त्यात सेरनन यांनी मुलीचे नाव कोरल्याचे दाखवले आहे. अपोलो १७ मोहिमेने चांद्रमोहिमेचा शेवट झाला असे म्हटलेले त्यांना रुचत नव्हते. त्यांच्या मते मानवाच्या अवकाश इतिहासाची ती सुरुवात होती. आपण आता चंद्रावर जाणार नसलो तरी पुढील शतकात मंगळाकडे वळावे लागेल, असे ते त्या वेळी म्हणाले होते.

नील आर्मस्ट्राँग व एडविन ऑल्ड्रिन यांच्या पहिल्या चांद्रमोहिमेने लोकांमध्ये जी उत्सुकता निर्माण केली ते भाग्य शेवटच्या मोहिमेला नव्हते हे खरे; पण या मोहिमेत सेरनन यांनी अनेक विक्रम केले होते. त्यात, चांद्रमोहिमेतील ३०२ तास. चंद्राच्या भूमीवर सर्वाधिक म्हणजे २२ तास ६ मिनिटे वास्तव्य, तर अवकाशात ५६६ तास व चंद्रावर एकूण तीन मोहिमांत ७३ तास वास्तव्य या विक्रमांचा समावेश आहे. अवकाश मोहिमांवरील खर्च कमी झाला त्या वेळी अमेरिकी काँग्रेसपुढे बाजू मांडताना त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या निधनाने चांद्रमोहिमेतील एक पर्वच विसावले आहे.