* मला फक्त मुलांना शाळेत सोडण्यासाठी दरमहा २०० किमी प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत मी सेकंड हँड टाटा नॅनो घेतली तर योग्य ठरेल काय?

माधुरी लेले

* होय, तीन ते चार वर्षे जुनी टाटा नॅनो घेणे केव्हाही योग्यच. मात्र, नीट पारखूनच घ्यावी. कारण अनेकदा जुन्या नॅनो पॉवर आणि बॅलेन्सिंग नीट राखत नाहीत. तसेच त्या गंजलेल्याही आढळतात.

 

* मला माझ्या कुटुंबीयांसाठी कार घ्यायची आहे. माझे बजेट चारपाच लाखांपर्यंत आहे. माझा मासिक प्रवास २०० ते ३०० किमीचा आहे. फक्त सुट्टीच्या दिवसांत प्रवासाची रेंज वाढते. मी कोणती गाडी घ्यावी? टाटा टियागो, शेवरोले बीट, वॅगन आर, सेलेरिओ या काही गाडय़ा आहेत, ज्या मला आवडतात. तुम्ही काय सल्ला द्याल.

संदीप गायकवाड

* तुम्ही दाई आय१० ही गाडी घ्यावी. सध्या या मॉडेलवर चांगल्या ऑफर्सही लागू आहेत. आय१० दणकट आहे, मायलेजही चांगला देते. मेन्टेनन्सही कमी आहे.

 

* मी पहिल्यांदाच गाडी घेत आहे, माझे चार लाख बजेट आहे आणि मासिक १२०० किमी प्रवास होईल कोणती गाडी घ्यावी डीजेल का पेट्रोल? कृपया मार्गदर्शन करावे.

मारोती वाघमारे

* तुम्ही रेनॉ क्विड किंवा टाटा टियागो यापकी कोणतीही एक गाडी घ्या. रिनग जास्त असेल तर टियागो घ्यावी.

 

* मला डिझेल हॅचबॅक घ्यायची आहे. मारुती स्विफ्ट व्हीडीआय किंवा नवीन फोर्ड फिगो टिटॅनियम घ्यावी, हे सांगा.

विवेक नागरगोजे

* नवीन फोर्ड फिगोला १.५ लिटरचे इंजिन आहे जे की २३ किमीचा मायलेज देते तर स्विफ्ट व्हीडीआयच्या इंजिनाची क्षमता थोडी कमी आहे. मात्र, ती दणकट आहे आणि फिगोपेक्षा महाग आहे. मेन्टेनन्सच्या दृष्टीने स्विफ्ट व्हीडीआय आणि रिट्झ डीडीआयएस चांगल्या आहेत.

 

* माझे बजेट सहा लाख रुपये आहे. हॅचबॅक घेऊ की एसयूव्ही. माझे मासिक ड्रायिव्हग ४०० ते ५०० किमी आहे. टियागो, झेस्ट, स्विफ्ट डिझायर यांच्यापकी कोणती गाडी चांगली आहे.

विशाल पाटील, औरंगाबाद

* ग्राऊंड क्लिअरन्सच्या दृष्टिकोनातून टियागो चांगली आहे. झेस्ट आणि केयूव्ही१०० याही चांगल्या गाडय़ा आहेत. टाटा झेस्ट सात लाखांपर्यंत मिळते.

 

* माझ्याकडे सँट्रो आहे. मी नवीन गाडी मिहद्रा केयूव्ही१०० घेऊ का? गाडी कशी आहे?

धनंजय खंदाड

* तुमचा वापर किती असेल हे माहीत नाही. तुम्ही गाडीचा वापर जास्त करणार असाल तर टियागो डिझेल तुमच्यासाठी योग्य ठरेल. पाच-सहा जणांसाठी गाडी हवी असेल तरच केयूव्ही१०० ही गाडी घ्या.

 

* माझे बजेट १३ लाखांचे आहे. माझे रोजचे ड्रायिव्हग १०० किमी आहे. मला सेडान गाडी घ्यायची आहे. सिआझ, व्हर्ना आणि होंडा सिटी यापकी कोणती गाडी चांगली ठरेल.

– सिद्धार्थ गायकवाड

* सुरक्षा आणि अत्रिडायिव्हगसाठी मी फोक्सवॅगन व्हेण्टा टीडीआय मॅन्युअल, अ‍ॅटोमॅटिक व्हर्जन ही गाडी सुचवीन. हिचा मायलेज चांगला आहे आणि आरामदायी गाडी आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com