• मला माझी पहिलीच कार घ्यायची आहे. माझे बजेट सहा ते सव्वासहा लाखांचे आहे. माझ्यासाठी सर्वोत्तम कार कोणती आहे? सेडानमध्ये मला चांगला पर्याय उपलब्ध आहे का? टाटांच्या सव्‍‌र्हिसबद्दल बरेच काय काय ऐकायला मिळते. ते खरे आहे का? मी टाटांची कार घेणे टाळू का?
    • योगेश तारोळे
  • नाही, टाटांची सव्‍‌र्हिस आता खूपच सुधारली आहे. तुम्ही टाटांच्या डिझेलवर चालणाऱ्या बोल्ट या गाडीचा विचार अगदी बेलाशकपणे करू शकता. किंवा मग तुम्ही मारुती बलेनोचा विचार करा. तुम्हाला गाडीतील जागेबाबत तडजोड स्वीकारायची असेल तर पोलो हा एक चांगला पर्याय आहे.

 

  • मला टाटा टियागो एक्सझेड (टॉप एण्ड पेट्रोल) ही गाडी घ्यायची आहे. मी तिचा वापर अगदी प्रासंगिक करणार आहे. ही गाडी चांगला पर्याय ठरू शकते का? पाच ते साडेपाच लाखांपर्यंत ती मिळू शकते का? मी असे ऐकले आहे की टियागोच्या वातानुकूलन यंत्रणेत काही तरी अडचणी आहेत. कृपया मार्गदर्शन करा.
    • कैलास सुभेदार
  • टियागोची वातानुकूलन यंत्रणा उत्तम आहे. तुम्ही निश्चिंतपणे ही गाडी घेऊ शकता. मात्र, वापर जास्त असेल तर मारुतीची सेलेरिओ घ्या. कारण टाटाच्या गाडय़ा एक दिवसाआड वापरल्या तर स्टार्टिगची मोठी अडचण उद्भवू शकते.

 

  • मला छोटी पॉवरफुल (१०००१२०० सीसी) हॅचबॅक गाडी घ्यायची आहे. माझे दिवसाचे रिनग १५२० किमी असेल. कधी तरी गावाला नेता येईल अशी पण असावी. मला होंडा ब्रिओ स्पोर्ट्स खूप आवडली. या गाडीबद्दल मार्गदर्शन करा किंवा पर्याय सुचवा.
    • रोहन वायळ, कल्याण.
  • होंडा ब्रियो उत्तम गाडी आहे. परंतु हायवेला आणि गावच्या रस्त्यांवर ती एवढी खास चालणारी नाही. तिचा ग्राऊंड क्लीअरन्सही खूप कमी आहे. त्यापेक्षा तुम्ही टाटा टियागो घ्या. आता टाटाच्या गाडय़ा उत्तम आहेत. नाही तर मारुती बलेनो घ्या, ही गाडी तुम्हाला तेवढय़ाच किमतीत मिळेल.

 

  • माझ्याकडे मारुतीची स्विफ्ट डिझायर २०१२ चे व्हीडीआय डीझेल ही गाडी आहे. ती आताही छान चालत आहे परंतु मी विचार करीत आहे की मी सेलेरिओचे झेडएक्सआय हे टॉप व्हरिएन्ट घेऊ. सर आपले काय मत आहे. माझे ड्रायिव्हग महिन्याला साधारण १५०० किमी होते आणि लांबच्या प्रवासालाही जाने होते कोणती गाडी चांगली आहे. कृपया मार्गदर्शन करा.
  • सेलेरिओ ही गाडी खास करून शहरात चालवण्यासाठी चांगली आहे. तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी गाडी घ्यायची असेल तर आहे तीच ठेवा किंवा मग फोक्सवॅगन पोलो टीडीआय ही गाडी घ्या. यात पॉवर आणि कम्फर्ट भरपूर आहे. जास्त स्पीडलाही गाडी हलत नाही.

 

  • सध्या माझ्याकडे मारुती८०० ही गाडी आहे. आता मला नवीन गाडी घ्यायची आहे. माझे बजेट पाच ते सात लाख रुपये आहे. कृपया चांगली गाडी सुचवा.
    • सतीश पळसुलेदेसाई, नाशिक
  • पाच ते सात लाखांत विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकू शकणारी गाडी म्हणजे मारुती स्विफ्ट. हिचा मायलेज १७ किमी प्रतिलिटर एवढा असून सस्पेन्शनही चांगले आहे.

 

  • सर, मला प्रीमियम हॅचबॅक गाडी घ्यायची आहे. माझे बजेट सात ते आठ लाख रुपये आहे. होंडा जॅझ आणि मारुती बलेनो यांपकी कोणती घ्यावी, याबद्दल थोडा गोंधळ आहे. नेमकी कोणती गाडी घेऊ.
    • राम हगवणे
  • पेट्रोलवर चालणारी गाडी घ्यायची असेल आणि जास्त ड्रायिव्हग हमरस्त्यावर असेल तर नक्कीच जॅझ घ्या. ती उत्तम आहे. परंतु डिझेलमध्ये मारुती बलेनो किंवा फोर्ड फिफो ही गाडी घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com