गेल्या अनेक आठवडय़ांपासून सातत्याने दुचाकींमध्ये ऑटोमॅटिक स्कूटरवर जास्त माहिती देतं आहे. यामागे कारणेही तशीच आहेत. विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत आपल्या सर्वाच्या मोबिलिटीच्या गरजा बदलत आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक स्थिती आपल्या सर्वानाच माहीत आहे. त्यामुळेच बहुतेक लोक स्वत:च्या मोबिलिटीवर जास्त भर देत आहेत. तसेच, बदलणाऱ्या आर्थिक स्थितीमुळे महिलांचेही नोकरी-व्यवसायातील प्रमाणात लक्षणीय सुधारले आहे. त्यामुळेच ऑटोमॅटिक स्कूटरना महत्त्व वाढ आहेत. तसेच, ऑटोमॅटिक स्कूटरमध्ये फटिक फ्री ड्रायव्हिंग असल्यामुळे पुरुषांचा कल असा स्कूटरकडे वाढत आहे. त्यामुळेच आपल्याकडे ऑटोमॅटिक स्कूटरची मॉडेलही आता अधिक उपलब्ध आहेत. देशात ऑटोमॅटिक स्कूटरचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे श्रेय कोणाला द्यावे, हा वेगळा विषय आहे. मात्र, तत्कालीन कायनेटिक होंडा कंपनीची ऑटोमॅटिक स्कूटर हिट नक्कीच झाली होती. पुढे दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. होंडाने पहिले उत्पादन ऑटोमॅटिक स्कूटरच लाँच केले. हे उत्पादन महिला आणि पुरुष अशा दोघांना डोळ्यांसमोर ठेवून बनविले होते. मात्र, तरुण ग्राहकांना विशेषत: कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवकांसाठी शंभर सीसीपेक्षा अधिक व स्टायलिश अशी ऑटोमॅटिक स्कूटर बाजारात नव्हती. याच पाश्र्वभूमीवर होंडाची डीओ भारतात लाँच झाली.

होंडा डीओचे मॉडेल हे काहीसे मोटो स्कूटरचे आहे. तसेच, वजनाला हलकी करण्यासाठी स्कूटरमध्ये फायरबॉडीचा वापर अधिक करण्यात आले आहे. तरुणांना भावेल, अशी हिची रचना असून, याची सीटिंग पोझिशनही काहीशी मोटरसायकलसारखी आहे. गेल्या तीन ते पाच वर्षांत होंडा डिओमध्ये अनेक छोटे-मोठे बदल झाले आहेत. ही स्कूटर तरुणवर्गामध्ये जास्त प्रसिद्ध असून, स्वत:ची बाजारपेठ निर्माण केली आहे. सध्या तरी या स्कूटरला विशेष स्पर्धा नाही. यामाहाची रे स्कूटर असली तरी तिची स्पर्धा डिओला झालेली नाही. भारतात पर्यावरणाशी संबंधित नवी मानके जाहीर झाल्यावर होंडाने डिओमध्येही नवे बीएस फोर कम्प्लायंट इंजिन बसविले आहेत. तसेच, अनेक नवी फीचर यामध्ये आणली आहेत. होंडा ईको टेक्नॉलॉजीचे ११० सीसीचे ८.१ पीएसचे इंजिन डिओला आहे. तसेच, सर्वात मोठा बदल स्कूटरच्या पुढील बाजूस केला आहे. ऑटो हेडलाइट ऑन या फीचरबरोबर व्ही आकाराचा एलईडी स्ट्रीप बसविण्यात आल्याने स्कूटरचा लुक सुंदर झाला आहे. हेडलॅम्प, टेललॅम्पमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मोबाइल चार्ज करण्यासाठी सीटच्या खाली असलेल्या डिक्कीत एक पोर्ट दिला आहे. इन्स्ट्रमेंट क्लस्टरमध्येही सुधारणा केली आहे. मात्र, सेमी डिजिटल दिलेले नाही. स्पोर्टी लुक देण्यासाठी डय़ूएल टोनचा वापर केली असून, नवी बॉडी ग्राफिक बसविण्यात आली आहेत. या सर्वामुळे स्कूटरचा लुक बदलला असून, तो थोडा प्रीमियमही वाटतो आहेत. उत्तम ब्रेकिंगसाठी कॉम्बिब्रेकिंग सिस्टीमही दिली आहे. मात्र, कंपनीने पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेले नाही. त्यामुळे मोठा खड्डय़ातून जाताना जर्क जाणवू शकतो. मागील सस्पेन्शन चांगले आहे. डिओला मॅग व्हील देण्यात आले नसले तरीही टय़ूबलेस टायरचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शहरात आणि मध्यम दुरीचे अंतर जाण्यासाठी डिओ नक्कीच चांगली आहे. शहरात प्रति लिटर ४० मायलेज मिळण्यास हरकत नाही. कॉलेजमध्ये जाणाऱ्या वा युवकांना मोटो स्कूटर इन्स्पायर्ड तरीही बजेट फ्रेंडली स्कूटर म्हणून डिओकडे नक्कीच पाहता येईल. तसेच, पारंपरिक डिझाइनची स्कूटर आवडत नसलेल्यांनाही आणि वजनास हलकी हवी, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी डिओची राइड घेऊनच आपला निर्णय घ्यायला हवा. पासष्ट ते सत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त बजेट नसलेल्या आणि ट्रेण्डी ऑटोमॅटिक स्कूटरचा पर्यायाच्या शोधात असलेल्यांसाठी डिओचा पर्याय नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. तरीही आपली गरज, आवड-निवड ओळखून, स्कूटरची टेस्ट राइड घेऊनच निर्णय घेतलेला चांगला.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर

obhide@gmail.com