38-lp-interiorआकार म्हटलं की आज आपल्या डोळ्यांसमोर विविध गोष्टी येत असल्या तरी मूळ आकार चारच. त्रिकोण, चौकोन, आयत आणि गोल. त्यांनी आपलं सगळं आयुष्य व्यापून टाकलं आहे.

जानेवारी २०१३. स्थळ- दहावीचा वर्ग. उपस्थित मंडळी- मी, माझी मुलगी, वर्ग शिक्षिका व भूमितीचा पेपर. ‘‘इतना सन्नाटा क्यूं है भाई?’’ म्हणण्यासारखी परिस्थिती. पेपरमध्ये पेन्सिलीने काढलेल्या त्रिकोण, चौकोनांपेक्षा लाल शाईतील गोल जास्त होते. आधीच आकडय़ांशी छत्तीसचा आकडा असलेल्या माझ्या मुलीला आता भूमितीतील वेगवेगळ्या आकारांनीसुद्धा छळायला सुरुवात केली होती! वेगवेगळ्या आकारातील त्रिकोण, त्रिज्या, कोन व प्रमेय ह्यंनी तिचा जीव मेटाकुटीस आला होता. पण लवकरच हे शत्रुत्व मत्रीत रूपांतरित झाले जेव्हा तिने कमíशयल आर्ट्सला प्रवेश घेतला. तिथे याच आकारांमध्ये ती अक्षरश: गुंगून गेली. एकेका आकाराचे वैशिष्टय़, त्यातून निघणारा अर्थ आणि त्याचा माणसाच्या शरीरावर व मनावर होणारा परिणाम या गोष्टी तिच्याबरोबर मलाही शिकायला मिळाल्या.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

व्यवहारात किंवा साधे बोलतानादेखील आपण किती तरी वेळा आकाराचा संदर्भ घेतो. हाताच्या आकारावरून भविष्य वर्तवले जाते. चेहऱ्याच्या आकारावरून एखाद्या माणसाबद्दलची आवड निवड ठरवली जाते. शब्दकोशातील आकाराचा अर्थ आहे बा रूपरेखा, आराखडा किंवा अगदीच यांत्रिकी भाषेत सांगायचे तर एका िबदूपासून निघालेली रेघ जेव्हा मूळ िबदूपाशी फिरून परत येते तेव्हा तयार होतो तो आकार. पण माणसाच्या जीवनात त्याचे आकाराशी असलेले नाते इतके रूक्ष नाही. एखादी गोष्ट जेव्हा अर्थपूर्ण भासते तेव्हाच आपण त्याला आकार म्हणून संबोधतो. ह्य लेखात आकारांचा व माणसांचा एकमेकांशी असलेला संबंध आपण बघणार आहोत.

त्रिकोण, चौकोन किंवा आयत व गोल हे झाले मूळ आकार. आपल्या आजूबाजूच्या जवळपास सर्व गोष्टी ह्य आकारात आपण बसवू शकतो. चित्रकार चित्र काढताना आधी मूळ आकारांचा आधार घेतो. उदाहरणार्थ चेहरा काढताना चेहऱ्याच्या ठेवणीनुसार गोल काढला जातो. नाकाच्या लांबीनुसार त्रिकोण बनतो. तर कानाच्या जागी प्रमाणशीर आयात काढला जातो आणि नंतरच मग त्यामध्ये तपशील भरले जातात. कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता त्याच्या आकारावर अवलंबून असते. मग ती पिन असो किंवा विमान.. आकार महत्त्वाचा.

लहानपणापासून माझ्या विश लिस्टमध्ये ईजिप्तचे पिरामिड सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. पिरामिडच्या भव्यतेबरोबरच त्याच्या आकाराचे नेहमीच मला आकर्षण वाटत आले आहे. पुढे रोमन व ग्रीक वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना त्रिकोणाचा सढळ हाताने केलेला वापर प्रकर्षांने जाणवला. मग हळूहळू लक्षात आले की अरे, कधीही स्वत:ची टिमकी न वाजवता हा बापुडा जिथे आधाराची गरज आहे तिथे तिथे हजर आहे. एखाद्या पुलाला आधार देणारी लाकडी किंवा लोखंडी फ्रेम असो किंवा बांधकामाच्या जागी लाकडाच्या फळ्यांनी केलेला सांगाडा असो- त्रिकोण पाहिजेच. वरून चौकोनी दिसणारा आकारसुद्धा तेव्हाच मजबूत होतो जेव्हा तो कमीत कमी दोन त्रिकोणांत विभागाला जातो. लहान-मोठे सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे  पत्त्याचे घर बनवणे! हे घर कसे बनवतो? त्रिकोण जोडूनच ना? मजा म्हणून चौकोनी पत्ते जोडून बघा.. बघा, तुमचे घर त्रिकोणाइतकेच मजबूत होते का? एक मात्र आहे फक्त प्रेमाच्या त्रिकोणात याचा पाया डगमगायला लागतो.

त्रिकोण व त्यापासून बनलेला त्रिमितीय पिरॅमिड, याच्या खास आकारामुळे जी ऊर्जा आतमध्ये तयार होते ती उपासनेसाठी, शांत निद्रेसाठी व सर्व ताण-तणावापासून मुक्तहोण्यासाठी अतिशय फायदेशीर असते, असे मानले जाते. या पिरॅमिडच्या मध्यावर ठेवलेले अन्न, इतर ठिकाणी ठेवलेल्या अन्नापेक्षा तीन-चार पटीने जास्त दिवस तसेच ताजे राहते. कुजण्याची प्रक्रिया संथ होते. हजारो वर्षांपूर्वी बांधलेले पिरॅमिड हेच दर्शवतात की इजिप्तच्या लोकांना या आकाराच्या वैशिष्टय़ाबद्दल किती ज्ञान होते. ज्यामुळे इतक्या वर्षांनीसुद्धा आपल्याला त्या काळाच्या संस्कृतीचा अभ्यास करता येणे शक्य झाले आहे.

वास्तुतज्ज्ञ गृहसजावटीमध्ये प्रत्यक्ष दिसत नसला तरी आवर्जून एक त्रिकोण पाळतात तो म्हणजे ‘स्वयंपाकघरातील त्रिकोण’. स्वयंपाकघरात काम करणारी व्यक्ती शेगडी, सिंक व फ्रिज या तीन ठिकाणी सतत फिरत असते. त्यामुळे या तीन जागांना जोडणाऱ्या त्रिकोणाची बेरीज ही कधीही १२-१४ फुटांपेक्षा जास्त नसावी. स्वयंपाकघर कितीही मोठे असले तरी या तीन गोष्टी एकमेकांच्या जवळ असल्याने कार्यक्षमता किती तरी पटींनी वाढते.

चौकोनी कुटुंब, चौरस आहार, स्क्वेअर डील, ऑन द स्क्वेअर असे किती तरी चौकोनांसंबंधी वाक्प्रचार आपण रोजच्या बोलीभाषेत वापरतो. कुठल्याही भरीव, नीटनेटक्या, विश्वासू गोष्टींसंबंधी बोलताना बऱ्याच वेळेला चौकोनी आकाराचा संदर्भ घेतला जातो. कारण या आकाराची आपल्या मनातली प्रतिमा एका आदर्श व्यक्तीसारखी आहे. जो कधीच चुकत नाही, स्वत:च्या मार्गापासून ढळत नाही. असा हा दृढनिश्चयी चौकोन/ आयत आपल्या आजूबाजूच्या बहुतांश वस्तूंमध्ये दिसतो. एवढेच नाही तर बहुतांश कंपन्यांचे लोगो, कंपनीचे नाव हे मुद्दामून या आकारांमध्ये डिझाईन करतात. उद्देश हाच की, लोकांना ही कंपनी विश्वासार्ह, प्रामाणिक वाटावी.

चौकोनी आकारात स्थिरता आहे. औपचारिकपणा आहे. बऱ्याच वेळेला त्याला बॉक्सी (ु७८) म्हणून हिणवले जाते. काही प्रमाणात ते खरेपण आहे. इतर वेगवेगळ्या आकर्षक आकारांमध्ये चौकोनी फíनचर नक्कीच बोजड दिसते. यावर एक उपाय म्हणजे चौकोनाच्या कडा थोडय़ा गोलाकार कराव्यात. त्याचप्रमाणे चौकोन बनवायची फ्रेम जरा नाजूक घेतल्यास तीच सजावट हलकी व आकर्षक दिसेल आणि कडा लागणारही नाहीत. सरळसोट चौकोनी फरशा कोनात फिरवून शंकरपाळ्यांचा आकार दिल्यास खुलून येतात. गृहरचनेत दिवाणखान्यातील बसायची रचना ही नेहमी चौकोनी करावी जेणेकरून एकमेकांचे चेहरे नीट दिसतील व संवाद करताना अडचण येणार नाही. एक मात्र नक्की, जरी चौकोनात नावीन्याचा अभाव असला तरी या नो नॉन्सेन्स आकाराची उपयुक्तता व आरामदायीपणा दुसऱ्या आकारात क्वचितच मिळेल. हो, पण त्याला आकर्षक करण्यासाठी तुम्हाला चौकटीबाहेर पडून विचार करावा लागेल.

चेंडू, फुगे, रंगीबेरंगी लिमलेटच्या गोल गोळ्या आणि त्याच्याकडे भान हरपून बघणारे टप्पोरे गोल डोळे!! डोळ्यांसमोर लगेच हसरी लहान मुले आली ना? गोल आकार आहेच तसा. सगळ्यांना हवासा वाटणारा. माणसाला बनवायला सर्वात अवघड आकार, पण निसर्गाने काय किमया केली आहे या आकारामध्ये!! ग्रह ताऱ्यांपासून फुलांपर्यंत आणि पावसाच्या थेंबापासून ते िशपल्यातील मोत्यापर्यंत हा गोल आकार आपल्याला मोहवून टाकतो. गोल हा सुरक्षित कवचासारखा, पूर्णतेकडे नेणारा, सर्वाना एकत्र आणणारा, अंतरंगात डोकावणारा आकार आहे. इतर वेळी लाजणाऱ्या मुलाला सगळ्यांसोबत गोलात बसवले तर तो आनंदाने सहभागी होताना दिसेल. सर्वाना सामावून घेणाऱ्या, समान पातळीवर आणणाऱ्या या गोलाच्या वैशिष्टय़ामुळे लहान मुलांचे बरेसचे खेळपण गोलात असतात.

चौकोनी बठकीच्या रचनेप्रमाणेच गोलाकार रचनापण दिवाणखान्यात संवादासाठी एकदम उत्तम. आजकाल ‘हेड ऑफ द टेबल’ (head of the table)  ही संकल्पना जाणीवपूर्वक मागे सारली जात आहे. पूर्वी आयताकृती टेबलामुळे एकच माणूस भाव खाऊन जायचा, पण आजकालच्या ‘हम साथ साथ है’च्या जमान्यात ऑफिसमधील कॉन्फरन्स टेबलं आता आयताकार सोडून गोल, त्रिकोणी किंवा व आकारांची होऊ लागली आहेत. जेणेकरून बॉसचे दडपण न येता विचारांची उत्तम देवाणघेवाण होते. लोकांना सामावून घेण्याच्या, एकमेकांशी जोडणाऱ्या या गोलाच्या प्रतिमेमुळे बऱ्याचशा कंपन्यांचे लोगो गोल आकारात दिसतात. जसे बँका, टेलिफोन कंपन्या, ऑलिम्पिक, ट्विटर, स्टारबक्स..

जागा कमी आहे अशा ठिकाणी चौकोनी टेबलापेक्षा गोल टेबल ठेवावे. ते जागा कमी व्यापते व सुटसुटीत दिसते. गृहसजावटीत गोलाकार रचनेमुळे सर्व लक्ष मध्ये केंद्रित होते.

गोल हा कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे आपण सांगू शकत नाही. तो अनंतात पसरलेला वाटतो. असे म्हणतात की देव असेल तर तो गोलाच्या रूपात आहे. ज्याचा मध्य सगळीकडे आहे पण ज्याचा परीघ कुठेच दिसत नाही.

बाकी काही असो, प्रसिद्ध कलाकार लिओनार्दो द विन्ची यांच्या म्हणण्यानुसार माणसाच्या शरीराचा आकार ही जगातील सर्वात सुंदर निर्मिती आहे. प्रत्येक भागाची एकमेकांशी असलेली प्रमाणबद्ध रचना हा आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण गाभा. आपल्या शरीरातील प्रत्येक भागाचे एकमेकांशी १:२ किंवा १:३ असलेले गुणोत्तर (१ं३्र) ही अचंबित करणारी गोष्ट आहे. लिओनार्दो द विन्ची यांनी निर्मिलेल्या वास्तुरचनेत हे गुणोत्तर प्रामुख्याने दिसून येत. त्यामुळे या वास्तू त्या काळच्या इतर वास्तूंमध्ये उठून दिसतात. माणसाच्या शरीराचा आकार हा वास्तुशास्त्र आणि गृहसजावटीचा मूळ पाया आहे. याचा अभ्यास न करता केलेली सजावट फक्त ‘आरास’ या सदरात मोडेल. ती ‘‘रचना’’ होणार नाही.

असे म्हणतात की गुरू आपल्या जीवनाला आकार देतो. कसा असावा हा आकार? त्रिकोणासारखा स्वत:ला व दुसऱ्यांना आधार देणारा, चौकोनासारखा विश्वासू का गोलासारखा सर्वाना सामावून घेणारा? मला वाटते आपल्या जीवनाचा आकार कॅलिडोस्कोपसारखा सगळ्याचे मिश्रण असलेला, रंगीबेरंगी व आनंद देणारा असावा.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com