लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह अजून काही पक्षांचा समावेश आहे. मात्र, अद्याप शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. तसेच ‘शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही’, असा दावा केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या जाहीरनाम्याचा तसाही काही उपयोग नाही. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण दोन्ही गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. हे मी आज स्पष्ट करत आहे. तसेही त्यांना जाहीरनामा कळत नाही, त्यांनी आधी लिहायला आणि वाचायला शिकले पाहिजे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi
एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला
naseem khan letter to congress
काँग्रेसला धक्का! माजी मंत्री नसीम खान यांनी मोठा आरोप करत प्रचाराला दिला नकार
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूरच्या सभेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती यांचा…”

ठेकेदारांना मालामाल करण्याचा डाव

केंद्र सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन सफेद कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मुंबईच्याच न्हावा-शिवा पोर्टस् वरून परदेशात जाणार आहे. ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्राचा कांदा हा सडत आहे, त्याला भाव नाही. येथे तुम्ही निर्यातबंदी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार तर लगेच बंदी केली. पण गुजरातचा पांढरा कांदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.