महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. नाशिक मतदारसंघाबाबत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या तिनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तसेच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव या मतदारसंघामधून चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे नाशिकमधून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अशातच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना एक सूचक विधन केलं. “प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभी करेन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत त्यांना एक सल्ला दिला आहे.

raj thackeray
Raj Thackeray महायुतीत येणार? नारायण राणे, दीपक केसरकर सूचक वक्तव्य करत म्हणाले, “निवडणूक जवळ आल्यावर…”
ajit pawar latest marathi news (2)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: जागावाटप जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाकडून मोठं विधान; विदर्भात ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार!
Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
ajit pawar on ladki bahin yojana rumors
Ajit Pawar : “निवडणुकीत हौशे, नवशे, गवशे येतील अन्…”, बारामतीतून अजित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं
nitin gadkari statement on castism
VIDEO : “जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरींचं विधान चर्चेत!
Raj Thackeray Raju Patil
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा एक आमदार सर्वांचं गणित बिघडवणार? राजू पाटील कोणाला मत देणार?
maharashtra mlc election votes calculation
एक उमेदवार हरणार हे नक्की, पण तो कुणाचा? वाचा विधानपरिषद निवडणुकीसाठीचं पक्षीय बलाबल!
bachchu kadu on maharashtra assembly election
बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार? १५ ते २० उमेदवार उभे करण्याच्या तयारीत, माध्यमांनी विचारताच म्हणाले…
ajit pawar latest marathi news (1)
‘तुम्ही हॉटेल पॉलिटिक्स करणार का?’, अजित पवारांना प्रश्न विचारताच दिलं सूचक उत्तर; म्हणाले, “आम्हाला जे…”

हेही वाचा : पंकजा मुंडे यांचं प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाल्या, “नाशिकमधून…”

छगन भुजबळ काय म्हणाले?

“त्यांनी (पंकजा मुंडे यांनी) बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावे. त्या निवडून येणं महत्वाचं आहे. तिकडे त्यांनी पूर्ण प्रयत्न करावे. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत अशी अडचण नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत हीच अडचण आहे. तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. सर्वांना बरोबर घ्या. कुठल्याही परिस्थितीत निवडून या”, असा सल्ला छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना दिला.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

बीडमध्ये झालेल्या सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणून मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.