पुणे : पोलिसांची सूचना डावलून आणि नियोजित मार्गात बदल करून पत्रकार निखिल वागळे सभास्थानी गेले. त्यामुळे त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला रोखणे शक्य झाले नाही. वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी तातडीने तेथे पोहोचण्यास विलंब झाला, असा खुलासा पुणे पोलिसांनी केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून निखिल वागळे यांच्यावर शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी हल्ला करण्यात आला. पोलिसांना या हल्ल्याची पूर्वकल्पना होती, मात्र, पोलीस चित्रपटातील पोलिसांप्रमाणे उशीरा पोहोचले, असा आरोप वागळे यांनी केला आहे. त्यानंतर पुणे शहर पोलिसांनी याबाबतचा खुलासा करणारे पत्रक प्रसारमाध्यमांना दिले. पोलिसांच्या जनसंपर्क विभागाने पाठवलेल्या या पत्रकावर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार

हेही वाचा…“…तरच तुम्ही पुण्याचे पोलीस आयुक्त”, संजय राऊतांनी दिलं खुलं आव्हान; म्हणाले, “..त्यांना घाबरलात का?”

निखिल वागळे यांनी समाजमाध्यमात वादग्रस्त टिप्पणी केल्याने पुण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. निखिल वागळे यांचे पुण्यात आगमन झाल्यावर त्यांचे मुक्कामाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. पुणे शहरात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाची माहिती त्यांना देण्यात आली. पोलिसांच्या सूचना मिळेपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका. कार्यक्रम स्थळाच्या परिसरात मोठया संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतरच वागळे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, असे त्यांना सांगण्यात आले होते.

निखिल वागळे यांनी कार्यक्रम स्थळी जाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी पोलीसांनी त्यांना कार्यक्रमाचे ठिकाण सुरक्षित करणे आवश्यक आहे. तोपर्यंत तेथे जाऊ नये, असे सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या आंदोलकांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू होती अशा परिस्थितीत पोलीसांना बळाचा वापर करणे कठीण झाले होते.

हेही वाचा…निर्भय सभेच्या आयोजकांसह भाजप, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

पोलिसांनी सूचना देऊनही निखिल वागळे कार्यक्रमाचे ठिकाणी रवाना झाले. रस्त्यात त्यांनी पोलीसांच्या वाहनांना चकवा दिला. नियोजित मार्ग बदलला. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाहनाचा पायी पाठलाग करून आंदोलकांपासून त्यांना सुरक्षित ठेवले होते. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला. तेव्हा वागळे यांच्या गाडीत त्यांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस होते. मात्र, तेथे वाहतूक कोंडी झाली होती. पादचारी आणि बघ्यांमुळे वागळे आणि त्यांच्या मोटारीला अशा परिस्थितीत बळाचा वापर करून त्वरीत बाहेर काढणे शक्य नव्हते. आरोपींविरुद्ध दंगल, मालमत्तेचे नुकसान या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची प्रक्रिया सुरू झाली असून, पुणे शहर पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…पुणे : शाब्बास पोलीस! शाळकरी मुलीचा अपहरणाचा कट उधळला

समाजमाध्यमात हल्ल्याची चित्रफित

वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्यावर समाजमाध्यमात चित्रफिती त्वरित प्रसारित झाल्या. माध्यम प्रतिनिधींनी या घटनेचे चित्रीकरण केले. मात्र, पोलिसांना ही बाब त्वरित समजली नाही का, असा प्रश्न पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.