इशान किशन Photos
कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे इशानला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये झारखंडचं नेतृत्व करताना इशानने तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच आटोपलेल्या मालिकेत इशानने वादळी शतक झळकावत टी२० वर्ल्डकपसाठी झालेली निवड सार्थ ठरवली. भारताचा टेस्ट आणि वनडे कर्णधार शुबमन गिलला टी२० प्रकारात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यामुळे गिलला वगळून इशानची निवड करण्यात आली. धावा करणं महत्त्वाचं होतं, मी तेच केलं असं इशानने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान सांगितलं. त्वेषाने फटकेबाजी करणारा पॉकेट डायनॅमो अशी इशानची ओळख आहे. सलामीला जागा नसल्यामुळे इशानला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जातं. या नव्या जबाबदारीला इशानने न्याय दिला आहे. फलंदाजीच्या बरोबरीने यष्टीरक्षणाची जबाबदारी हाताळत असल्याने इशांत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडूच असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आयपीएल स्पर्धेत गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी इशानने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्ध्यांनी धसका घ्यावा अशी फटकेबाजी मात्र दर्जेदार गोलंदाजीचा सामना करताना तंत्र अधिक घोटीव करण्याची आवश्यकता. संजू सॅमसन फॉर्मात नसल्यामुळे इशानला सलामीवीर म्हणून बढती मिळू शकते.
Read More
