-
इशान किशन सध्या भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इशानला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आलं होतं, पण मानसिक थकवा असल्याचं कारण देत त्याने टीममधून नाव मागे घेतलं होतं.
-
तेव्हापासून इशान किशन कोणत्याही फॉरमॅटमधील मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. अलीकडेच इशान किशनला रणजी करंडक खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण तो झारखंडसाठी उपलब्ध नव्हता.
-
दरम्यान, इशान किशनशी संबंधित रंजक गोष्ट जाणून घेऊया, जेव्हा तो टेलिफोन चोरी करताना रंगेहाथ पकडला गेला होता.
-
मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड असताना रोहित शर्माने ही गोष्ट फार पूर्वी उघड केली होती. शेन बाँडने त्याच्या ट्रेनरसोबत इशान किशनची फजिती केली होती.
-
दोघांनी लाऊंजचा टेलिफोन इशानच्या बॅगेत ठेवला होता, त्यानंतर सिक्युरिटीने चेकिंगच्या वेळी त्याला थांबवले.
-
रोहित पुढे म्हणाला, “त्यानंतर सुरक्षा लोकांनी त्याला थांबवले आणि विचारले, तुम्ही लाउंज फोन कुठे नेत आहात? तुम्ही इथे चोरी करण्यासाठी आला आहात का?”
-
यानंतर रोहितने सांगितले, “इशानला धक्काच बसला आणि म्हणाला नाही सर, मी का घेऊ? माझ्याकडे दोन मोबाईल आहेत.”
-
हिटमॅनने पुढे खुलासा केला की पॉल चॅम्पमन आणि बाँड यांनी सुरक्षा व्यक्तीला त्यांच्यासोबत ठेवले होते हे नंतर उघड झाले.
