scorecardresearch

सचिन तेंडुलकर Videos

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
former cricketer sachin tendulkar and wife anjali spotted in restaurant at bandra
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला!

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला!

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Blades of Glory Rohan Patil
पुण्यात Blades of Glory क्रिकेटचं संग्रहालय उभारणारे रोहन पाटे | गोष्ट असामान्यांची भाग ६६

आपल्या क्रिकेटच्या प्रेमापोटी रोहन पाटे यांनी पुण्यात २०१२ साली ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ नावाचं आगळं-वेगळं संग्रहालय उभारलं आहे. ९०च्या दशकापासून ते…

ताज्या बातम्या