आता तुम्ही म्हणाल भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा या लेखमालिकेशी काय संबंध? विशेषतः आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याशी संबंधित लेखमालिकेत. पण ज्याप्रमाणे त्यांचा स्ट्रेट ड्राइव्ह आहे, त्याचप्रमाणे वित्तीय वर्तनदेखील अगदी सरळ आणि साधे आहे. हा खरेतर घोटाळा नसून प्राप्तिकर विभागाने टाकलेला एक फसवा बाउन्सर चेंडू होता. तोदेखील सचिन तेंडुलकर यांनी, त्या बाउन्सरला अप्पर कट मारून चक्क सीमापार केले आणि षटकार वसूल केला.

वर्ष २०११ हे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी आणि विशेषतः सचिन तेंडुलकर यांच्यासाठी देखील खासच होते. कारण त्या वर्षी तेंडुलकर यांनी दोन सामने जिंकले. एक म्हणजे विश्वचषक आणि दुसरा प्राप्तिकर खटला. सामना जिंकला म्हणून, अन्यथा घोटाळाच झाला असता. प्राप्तिकर कायदा १९९५ नुसार, तुम्ही जर अभिनेता म्हणजे नट किंवा नटी असाल आणि तुमचे उत्पन्न परकीय चलनात असेल तर कायद्याच्या कलम ८० आरआरप्रमाणे प्राप्तिकर भरण्यात तुम्हाला सूट आहे. सचिन तेंडुलकर यांनी वर्ष २००१ मध्ये सुमारे सहा कोटी रुपये विविध जाहिरातींमधून कमावले आणि त्यातील १.७७ कोटी रुपये परदेशी चलनात होते. अर्थातच कायद्याच्या वरील तरतुदीप्रमाणे त्या रकमेवर प्राप्तिकर भरण्यातून सूट मास्टर ब्लास्टरने आपल्या परताव्यात दाखवली. पण हा दावा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी फेटाळला आणि सांगितले की, जी सूट नटाला मिळते ती सूट क्रिकेटपटूला मिळणार नाही. तरीही सचिनच्या वकिलांनी हा दावा केला की, बीसीसीआयकडून जे उत्पन्न मिळते ते इतर उत्पन्न असून जाहिरातींचे उत्पन्न उद्योग व व्यवसायामधून मिळाले आहे आणि ते बरोबरच आहे. मग हा दावा गेला अपिलीय प्राधिकरणात आणि तिकडे तर अधिकाऱ्यांनी म्हटले की, सचिन तेंडुलकर हे जर क्रिकेटपटू नसतील तर भारतात काय जगातसुद्धा कुणी क्रिकेटपटू असू शकत नाही. तर सचिन तेंडुलकर यांचे म्हणणे होते की, तो नटच आहे. कारण तो सार्वजनिक कलाकार आहे. बरीच वर्षे दोन्ही बाजूने कागदोपत्री युक्तिवाद सुरू होता.

Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
“Hats off to Rohit”; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रोहित शर्मावर फिदा!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
Harmanpreet Kaur believes in winning the ICC World Cup cricket tournament sport news
विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी! ऑस्ट्रेलियालाही टक्कर देण्याचा महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास
Article about the record for gold medals won by men and women teams at the Chess Olympiad
भारताच्या बुद्धिबळ वैभवाची साक्ष!
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान
India Clinch Historic Gold at 45th Chess Olympiad 2024 as Arjun Erigasi and D Gukesh Wins Their Matches
Chess Olympiad 2024: भारताने ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक, चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची चमकदार कामगिरी

हेही वाचा : Gold-Silver Price on 21 April 2024: सोन्याच्या किमतीने केला कहर, लोकांना फोडला घाम, १० ग्रॅमचा दर जाणून घ्या

सचिन तेंडुलकर यांच्या वकिलांचे वारंवार म्हणणे होते की, तो कलाकारच आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो कलाकार आहे पण त्याआधी तो क्रिकेटर आहे आणि म्हणून या तरतुदी त्याला लागू होत नाहीत. त्यांनी जर क्रिकेटपटू म्हणून खेळातून परदेशी चलनात उत्पन्न मिळवले असते तर ते पात्र ठरले असते. एका युक्तिवादात तर अधिकारी म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’ म्हणजे ओळखच नाही आणि त्यांना स्वतःला ठरवता येत नाही की, ते क्रिकेटपटू आहेत की अभिनेता. अखेरीस २०११च्या मे महिन्यात अपिलीय प्राधिकरणाने सचिन तेंडुलकर यांच्या बाजूने निकाल दिला. त्यात त्यांनी असे म्हटले की सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटूच आहेत, पण तरीही जेव्हा लाइट्स कॅमेरा आणि ॲक्शन म्हटल्यानंतर त्याला आपली सर्जनशीलता, कल्पना आणि कौशल्य दाखवावेच लागते. ज्याप्रमाणे एखादा कसलेला कलाकार दाखवतो. तसेच कुठल्याही व्यक्तीला दोन व्यवसाय असण्यातसुद्धा काही गैर नाही आणि त्यामुळे प्राप्तिकर विभागाचे म्हणणे योग्य ठरत नाही.

हेही वाचा : ‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत वर्षभरात १.६५ कोटींची भर

थोडक्यात काय तर एक घोटाळा पुन्हा एकदा होता होता वाचला. घोटाळ्याचा चुकीचा आरोप हाच एक घोटाळा! अशा आपल्या लाडक्या मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटूला (की अभिनेत्याला?) २४ एप्रिलच्या ५१ व्या वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा!

डॉ. आशीष थत्ते
@AshishThatte
ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत