माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समर्पित असलेल्या ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीने महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी या प्रोजेक्टमध्ये तब्बल ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षांत करण्यात येणार असल्याचे कंपनीने एका निवेदनामध्ये म्हटले आहे. मात्र, या प्रोजेक्टमध्ये सचिन तेंडुलकरची किंवा अजून इतरांची गुंतवणूक किती असेल? याबाबत कोणतीही माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही.

निवेदनात काय म्हटले आहे?

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, निवृत्त शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, कंपनीचे संस्थापक राजेंद्र चोडणकर यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई येथील सॅटेलाईट सिटीमध्ये २५ हजार चौरस फुटांच्या सेटअपचे २३ मार्च रोजी अनावरण करण्यात आले. या नवीन योजनेची सुरूवात करत असताना ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पुढच्या पाच वर्षांमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हा टप्पा कंपनी निश्चित यशस्वी पार करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

RBI restrictions on Konark Urban Cooperative Bank
रिझर्व्ह बँकेचे कोणार्क अर्बन सहकारी बँकेवर निर्बंध
ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
Cyber Fraud Mumbai crime Cases
जैसे ज्याचे कर्म तैसे! कंपनीला गंडा घालून मिळवलेले १ कोटी रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक

हेही वाचा : सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..”

ही कंपनी काय सेवा देणार?

ही सेवा देत असताना सरकारी सुविधांचा लाभ या प्रोजेक्ट वाढविण्यासाठी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. याबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक क्षेत्रांना या माध्यमातून सेवा देण्यात देईल. कंपनीचे संस्थापक राजेंद्र चोडणकर यांनी सांगितले, “हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील आघाडीचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट असेल. तसेच सचिन तेंडुलकर हे या कंपनीतील स्ट्रॅटेजिक गुंतवणूकदार असतील”, असे त्यांनी सांगितले.

सचिन तेंडुलकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“भविष्यात संपूर्ण जगात प्रभाव पाडेल, असे उद्योग भारत देश निर्माण करत आहे. त्यामुळे मी देखील याचा एक हिस्सा आहे, अशा गोष्टीचे समर्थन करताना मला आनंद होत आहे”, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर यांनी दिली.