मराठी असो किंवा हिंदी चित्रपट सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रंगभूमीपासून त्याने आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. आजच्या घडीला सिद्धार्थने बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर करत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नुकताच तो कामानिमित्त मुंबई ते गोवा असा विमानप्रवास करत होता. परंतु, या प्रवासादरम्यान सिद्धार्थला संतापजनक अनुभव आला. याबद्दल एक्स पोस्ट शेअर करत अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घडल्याप्रकाराचा व्हिडीओ देखील त्याने शेअर केला आहे.

सिद्धार्थ जाधवने व्हिडीओ शेअर करत एका नामांकित कंपनीच्या विमानातून प्रवास करताना त्याला कसा अनुभव आला याबद्दल त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. मुंबई ते गोवा असा प्रवास करताना त्याला नेमका काय अनुभव आला याचा खुलासा अभिनेत्याने या पोस्टद्वारे केला आहे.

हेही वाचा : Video : “राजा फोटो माझा काढ…”, मराठी गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

नामांकित विमान कंपनीचा उल्लेख करत सिद्धार्थ म्हणतो, “हाय नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही स्वत:च बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतली आहे. या लोकांनी फक्त माझ्या बॅगेचं हँडलच नीट ठेवलंय. बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा. इंडिगो तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतलीये हे पाहून मला छान वाटलं.” हे सगळं सिद्धार्थ अतिशयोक्तीमध्ये या व्हिडीओद्वारे बोलत होता. यामध्ये त्याने संतापजनक इमोजी जोडून संबंधित विमान कंपनीला टॅग केलं आहे.

हेही वाचा : “खोटी आणि अर्थहीन…”, साखरपुड्याच्या व्हायरल बातमीवर बबिता आणि टप्पूने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तो ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटात झळकला होता.