scorecardresearch

टी 20 Videos

टी-२० हा क्रिकेट खेळामधील एक विशिष्ट फॉरमॅट आहे. नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये २० षटकांचा समावेश असतो. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटकांचा सामन्यांचा समावेश असल्याने सध्याच्या युवा पिढीचा टी-२० सामने खेळण्याकडे कल वाढत आहे. शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप २००२ मध्ये खेळला गेला. यामध्ये टी-२० सामन्यांप्रमाणे कमी षटक होते. पुढे २००३-०४ मध्ये इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने टी-२० सामने खेळायला सुरुवात झाली. ५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्या महिला संघांमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर फेब्रुवारी २००५ मध्ये न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला पुरुषी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर २००७ मध्ये आयसीसी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे जगभरामध्ये टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता वाढली. भारतामध्ये २००८ मध्ये आयपीएल क्रिकेट फेंचायझी लीगला सुरुवात झाली. यामुळे भारतामध्ये टी-२० सामने खेळण्याचे प्रमाण वाढले. आज कसोटी, एकदिवसीय सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि राज्यस्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाते. Read More