scorecardresearch

ठाणे न्यूज Photos

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
Mira Road Murder Case Mumbai
24 Photos
भयानक… ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि…; काय आहे मीरारोड हत्या प्रकरण?

मीरारोडमध्ये एका व्यक्तीने लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे कापून गॅसवर शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! (फोटो – एएनआय/लोकसत्ता ग्राफिक्स…

Loksatta Thane Shopping Festival
10 Photos
Photos: लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल २०२३ – ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील दि. ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दिवसात सहभागी झालेल्या १६ भाग्यवान विजेत्यांना ९ फेब्रुवारी रोजी…

9 Photos
ठाण्यातील आठ वर्षांच्या चिमुरडीने यशस्वीरीत्या पार केला ५३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक

गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहानगी मुलगी आहे, जिने हे बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केले आहे. तर देशात ती दुसरी…

maharashtra cm eknath shinde car number plate 567 auctioned in thane rto for this price
15 Photos
फक्त CM शिंदेंचीच नाही तर त्यांच्या कारच्या नंबर प्लेटचीही तुफान क्रेझ; 567 साठी चढाओढ, किती रुपयांना झाला लिलाव पाहिलं का?

साधारणपणे चांगल्या (उदा. ४४४४, ९९९९) क्रमांकांसाठी अधिक मागणी असते. मात्र आता मुख्यमंत्री शिंदेंच्या आवडत्या क्रमांकाला मागणी वाढू लागली आहे.

Dahi Handi 2022 Aaditya Thackeray Anand Dighe
12 Photos
Photos: दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे; थेट आनंद आश्रमात पोहोचले अन्…

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली होती.

Thane Bike Accident
5 Photos
Photos: बेजबाबदारपणाचा बळी… मित्राच्या भेटीसाठी आलेल्या दुचाकीस्वाराचा खड्ड्यात पडून दुर्देवी अंत

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत या व्यक्तीला खड्ड्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले