ठाणे : राज्य परिवहन सेवेत (एसटी) बनावट प्रमाणपत्राच्या आधारे अनुकंपा तत्त्वावर लिपीक पदावर सेवेत दाखल झालेल्या ३६ वर्षीय कर्माचाऱ्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याला तीन महिन्यांपूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याप्रकारामुळे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याचे अधोरेखित होत आहे.

नवनियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून केली जात होती. त्यानुसार मे २०२३ मध्ये एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाकडून नवनियुक्त कर्चमाऱ्यांची ५८ प्रमाणपत्रे परिषदेकडे पाठविण्यात आली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये परिषदेने एक अहवाल महामंडळाकडे पाठविला. या अहवालाचे अवलोकन केले असता, ५८ प्रमाणपत्रांपैकी तीन प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. हे प्रमाणपत्र महामंडळाच्या कार्यशाळेतील विभागीय भांडार शाखेत लिपीक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे असल्याचे स्पष्ट झाले. ते अनुकंपा तत्त्वावर महामंडळामध्ये रूजू झाले होते. तसेच त्यांनी टंकलेखन गतीची ही प्रमाणपत्रे होती.

हेही वाचा – उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात

हेही वाचा – उल्हासनगरात कलानी ताकदवान, श्रीकांत शिंदेंकडून टीम कलानीवर स्तुतीसुमने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित प्रकारानंतर त्या कर्मचाऱ्याला जानेवारी महिन्यात सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या बडतर्फ कर्माचाऱ्याच्या अडचणी वाढणार आहेत.