Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

योगेंद्र यादव Videos

योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.

२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
Read More
Loksatta Lok Samvad Interview With President of Swaraj Abhiyan Yogendra Yadav
Loksatta Lok Samvad: ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये योगेंद्र यादव यांची रोखठोक मुलाखत | Yogendra Yadav

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपा यांचा ‘४०० पार’चा नारा प्रत्यक्षात येऊ नये, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही इच्छा होती. भाजपाला…

ताज्या बातम्या