Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

योगेंद्र यादव News

योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.

२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
Read More
Yogendra Yadav
Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात काय शिजतंय? म्हणाले, ४०० पारच्या भितीने…

Yogendra Yadav On BJP RSS Relations : ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात योगेंद्र यादवांनी भाजपाच्या रणनितीवर भाष्य केलं.

Yogendra Yadav On Congress
Yogendra Yadav On Congress: काँग्रेसचं भवितव्य कशावर अवलंबून आहे? योगेंद्र यादव यांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्षाला नव्याने…”

काँग्रेस पक्षाचं पुढचं भवितव्य कशावर अवलंबून असेल? याबाबत आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठं भाष्य केलं.

conversation with activist yogendra yadav on various issues
Yogendra Yadav : राष्ट्रवाद, धर्म, संस्कृती हे मुद्दे भाजपकडून काढून घेणे हे खरे आव्हान! प्रीमियम स्टोरी

विविध विषयांवर ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सविस्तर, अभ्यासपूर्ण भाष्य केले.

yogendra yadav in loksatta lok samvad event ,
‘४०० पार’ होऊ नये, ही संघाचीही इच्छा! योगेंद्र यादव यांचे विधान

भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रातील निकाल नेमका काय असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना योगेंद्र यादव यांनी मोठा दावा केला आहे.

Yogendra Yadav BJP Win NDA Congress
“मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी…”, योगेंद्र यादव यांनी दिलं स्पष्टीकरण, पुन्हा सांगितलं किती जागा मिळणार

योगेंद्र यादव यांनी भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असे भाकीत वर्तविल्याच्या बातम्या माध्यमात येऊ लागल्यानंतर आता त्यांनीच एक्सवर पोस्ट टाकून याबाबत…

Prashant Kishor on Yogendra Yadav
‘जिंकणार तर भाजपाच, काँग्रेसला किती जागा?’ योगेंद्र यादव यांच्या अंदाजानंतर प्रशांत किशोर यांचा टोला

Lok Sabha Elections 2024 : एनडीए आणि इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणुकीत विजय होणार असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. दरम्यान…

yogendra yadav latest news
“महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएच्या २० जागा कमी होणार”, योगेंद्र यादव यांनी वर्तवला अंदाज; म्हणाले, “४८ जागांपैकी…” प्रीमियम स्टोरी

योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणूक निकालांबाबत अंदाज वर्तवला असून त्यात महाराष्ट्रात एनडीएला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

yogendra yadav prediction on bjp
“भाजपाला २३३ तर एनडीएला…”, लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित!

योगेंद्र यादव यांनी राज्यनिहाय जागांचं गणित मांडत निकालाच्या आकड्याबाबत भाकित केलं आहे. त्यानुसार भाजपाला…