02 December 2020

News Flash

फंड विश्लेषण.. कॅनरा रोबेको बॅलंस्ड फंड

सध्याच्या दररोज वरखाली होणाऱ्या निर्देशांकामुळे कुठल्याही समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडापेक्षा बॅलंस्ड फंडात गुंतवणूक करणे कमी जोखमीचे आहे.

av-06फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग व रोखे गुंतवणूक असलेला फंड
जोखीम प्रकार     :    समभागकेंद्रित गुंतवणूक असल्याने जोखीम अधिक
गुंतवणूक    :    हा फंड समभागकेंद्रित बॅलंस्ड फंड आहे. क्रिसिल बॅलंस्ड फंड इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून १२ महिन्यांच्या आत बाहेर पडल्यास १% निर्गमन शुल्क लागू.
फंड गंगाजळी    :     ३१ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या विवरण पत्रकानुसार एकूण गुंतवणुकीच्या ७२.६० टक्के समभागात व २४.१४ टक्के गुंतवणूक रोख्यात असून उर्वरित गुंतवणूक रोकड सममूल्य उछइड प्रकारात गुंतविली आहे.
निधी व्यवस्थापक    :    कृष्णा सिंघवी हे या फंडाचे समभाग निधी व्यवस्थापक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी व व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून ते ‘सीएफए’ आहेत. अवनीश जैन हे या फंडाचे रोखे गुंतवणूक व्यवस्थापक आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकीची व आयआयएम कोलकाता येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    गुंतवणूक करण्यासाठी फंड घराण्याच्या www.canararobeco.com संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा CRB हा एसएमएस ९९६९७०३६४७ या क्रमांकावर पाठवावा.
सध्याच्या दररोज वरखाली होणाऱ्या निर्देशांकामुळे कुठल्याही समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडापेक्षा बॅलंस्ड फंडात गुंतवणूक करणे कमी जोखमीचे आहे. मागील एका वर्षांचा विचार केल्यास कॅनरा रोबेको बॅलंस्ड फंड हा बॅलंस्ड फंड या गटात गुंतवणूकदारांना अव्वल परताव्याचा दर राखणारा फंड म्हणून सिद्ध झाला आहे. तीन वष्रे, पाच वष्रे व १० वष्रे या काळातील परताव्याचा दराच्या तुलनेत ४० पकी ३५ तिमाहीत हा फंड पहिल्या पाच फंडांत सातत्य राखणारा फंड आहे. जून २०१५ पासून या फंडाने अन्य बॅलंस्ड फंडांप्रमाणे दरमहा लाभांश जाहीर करण्यास सुरुवात केल्यामुळे जे गुंतवणूकदार दरमहा अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी गुंतवणूक करू इच्छितात, या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी या फंडातील गुंतवणूक आदर्श गुंतवणूक आहे. सोबत दिलेल्या १३ नोव्हेंबरच्या फंडाच्या ग्रोथ एनएव्हीनुसार परताव्याची चलत सरासरी दर्शविणाऱ्या आलेखात वेगवेगळ्या कालावधींत या फंड गटाच्या सरासरीच्या तुलनेत फंडाची सरस कामगिरी नजरेत भरणारी आहे.
कोणत्याही फंडाची कामगिरी तपासण्यासाठी केवळ परताव्याच्या दरावर गुंतवणुकीचा निर्णय न करता जोखिमेशी सुसंगत परताव्याचा दर (Risk Adjusted Returns) पाहून गुंतवणुकीचा निर्णय करायचा असतो. या परिमाणावर हा फंड कायम पहिल्या तीन क्रमांकांत राहिलेला आहे. फंडाचे निधी व्यवस्थापक मर्यादित जोखीम घेऊन अव्वल परतावा मिळविणारे म्हणून ख्यात असलेले निधी व्यवस्थापक आहेत. या फंडाची मालमत्ता ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी ४३१ कोटी होती. मोìनगस्टार या म्युच्युअल फंडांची पत ठरविणाऱ्या संस्थेने या फंडास ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ दिले आहे. या फंड गटातील ही सर्वोच्च पत आहे. ही पत घेतलेल्या जोखिमेच्या तुलनेत अव्वल परतावा देणारा फंड असल्याचे दर्शविते.
सोबतचा आलेख क्रमांक २ हा फंडाची तीन वर्षांतील एका वर्षांची चलत सरासरी (One year Rolling Returns) दर्शवत आहे. चलत सरासरी म्हणजे प्रत्येक दिवशी मागील एका वर्षांचा परताव्याचा दर होय. चलत सरासरी ही फंडाची कामगिरी जोखण्याची एक चांगली पद्धत आहे. या चलत परताव्याच्या दाराशी फंडाच्या क्रिसिल बॅलंस्ड फंड इंडेक्स या संदर्भ निर्देशांकाच्या त्याच्या कालावधीतील चलत सरासरीशी तुलना केली असता बहुतांश वेळी फंडाने संदर्भ निर्देशांकाहून अधिक परतावा दिला आहे.
३१ ऑक्टोबर २०१५ च्या गुंतवणूक माहिती पत्रकानुसार फंडाच्या एकूण गुंतवणुकीपकी ७२.६० टक्के गुंतवणूक ही समभाग गुंतवणूक असून २४.१४ टक्के गुंतवणूक रोख्यात असून उर्वरित गुंतवणूक रोकड सममूल्य गुंतवणूक साधनांत गुंतविली आहे. समभाग गुंतवणुकीत प्रामुख्याने मिडकॅप धाटणीच्या कंपन्या असून बदलत्या आíथक परिमाणांची दखल घेऊन आíथक आवर्तनाच्या दिशाबदलाचा फायदा होणाऱ्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यातून गुंतवणूक केलेली दिसत आहे. पहिल्या दहा गुंतवणुकांतून रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टाटा मोटर्स (डीव्हीआर), अ‍ॅक्सिस बँक या लार्ज कॅपबरोबरीने ब्रिटानिया, कोलगेट नवीन फ्लोरिनसारख्या मिड कॅप दिसून येत आहेत. गुंतवणुकीत पहिल्या पाच गुंतवणुकांचा एकत्रित वाटा २३% असल्याने गुंतवणुकीची धाटणी जोखीम विकेंद्रित करण्याकडे आहे. या कारणाने पुढील तीन वर्षांत हा फंड अव्वल परतावा देणारा फंड ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही. गुंतविलेल्या रोख्यांची ५-६ वष्रे मुदतपूर्ती असल्याने या फंडाला रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या दरकपातीचा मोठा फायदा झाला आहे. पुढील वर्षी अर्थतज्ज्ञांना व्याज दरात किमान अध्र्या टक्क्याच्या कपातीची अपेक्षा असल्याने रोखे गुंतवणूक अव्वल परताव्यात आपला वाटा उचलेल. फंडात मागील १०० महिने १,००० रुपयांची एसआयपी करणाऱ्याने १००,००० गुंतविले आहेत. या एक लाखाचे १३ नोव्हेंबर २०१५ च्या ‘रेग्युलर ग्रोथ’ एनएव्हीप्रमाणे १९०,६५९ रुपये झाले आहेत. या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर १५.२५ टक्के आहे.
av-07
हा फंड पहिल्या एनएव्हीपासून परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड आहे. मागील तीन वर्षांचा विचार करता या फंडाच्या कामगिरीत उत्तरोत्तर सुधारणा होत आहे. सेवानिवृत्त गुंतवणूकदारांना मासिक लाभांशामुळे दरमहा उत्पन्नाचे साधन म्हणून या फंडाची शिफारस करावीशी वाटते. १३ नोव्हेंबर २०१० रोजी ६१.११ या एनएएव्हीप्रमाणे पाच लाख गुंतवून दरमहा ३,००० एसडब्ल्यूपीद्वारे (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल)    काढणाऱ्या गुंतवणूकदाराला आजपर्यंत १८०,००० रुपये मिळाले असून १० नोव्हेंबर २०१५च्या एनएव्हीनुसार त्या दिवसाचे गुंतवणूक मूल्य ६४४,७३५ रुपये आहे. फारशी जोखीम न स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड अव्वल परतावा देईल असे मानण्यास जागा आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 1:01 am

Web Title: canara robeco balance fund
टॅग Fund
Next Stories
1 सावधान नजर तुमच्यावर आहे!
2 दिवस तुझे फुलायचे!
3 संलग्न पुट आणि संरक्षणात्मक पुट
Just Now!
X