अनिश्चित शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला ‘डिफेन्सिव्ह स्टॉक’ घ्यायला हवेत. औषधी कंपन्या तसेच तंबाखू किंवा मद्य निर्मिती कंपन्यांमधील गुंतवणूक अशा वेळी नेहमीच फायद्याची ठरते. आज सुचविलेला शेअर हा देशी दारूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा आहे.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती

१९८१ मध्ये श्री. जिमी अल्मेडा यांनी जीएम ब्रुअरीजची स्थापना केली. शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली देशी दारूची निर्मिती करणारी ही बहुधा पहिलीच कंपनी असावी. सामान्य माणसाला किफायती दरात मद्य मिळावे या उद्देशाने सुरू केलेली ही कंपनी आज महाराष्ट्रातील देशी दारूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. पूर्वी देशी दारू केवळ ७५० मिलिलिटर आणि ३७५ मिलिलिटरमध्ये उपलब्ध होती. आज मात्र केवळ जीएम ब्रुअरीजमुळे इतर मद्याप्रमाणेच देशी दारूदेखील १८० मिलिलिटरमध्ये उपलब्ध आहे. तसेच कंपनीने पेट बॉटलमध्ये मद्य वितरण सुरू केले आहे. कंपनीचा मद्य निर्मितीचा अद्ययावत कारखाना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्य़ात विरार येथे असून गेल्या २५ वर्षांत वाढत्या मागणीनुसार कंपनीची उत्पादन क्षमता प्रतिदिन २०० केसेसवरून प्रतिदिन ५०,००० केसेस वर गेली आहे. केवळ १४.६२ कोटी रुपये भाग भांडवल असलेल्या या कंपनीने ३० जून २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी १०१.२७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५.७३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ४१ टक्क्यांनी अधिक आहे. कुठलेही कर्ज नसलेली जीएम ब्रुअरीज ही एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.