18 February 2019

News Flash

गुंतवणूक कट्टा.. : शेअर बाजार ढेपाळला; ‘एसआयपी’ बंद करू का?

गेल्या तीन वर्षांमध्ये, खासकरून नोटाबंदीनंतर सर्वसामान्य मध्यम वर्ग म्युच्युअल फंडांकडे वळला

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या तीन वर्षांमध्ये, खासकरून नोटाबंदीनंतर सर्वसामान्य मध्यम वर्ग म्युच्युअल फंडांकडे वळला. त्यामागे कारण म्हणजे मुदत ठेवीवरचे कमी होणारे व्याज दर, अतिशय वेगात वाढलेला शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निरनिराळे आर्थिक साक्षरता उपक्रम. म्युच्युअल फंडांनी या संधीचा भरपूर फायदा घेऊन स्वत:कडे सामान्य जनतेचा भरपूर पैसा खेचून घेतला (आणि लोकांनी दिलासुद्धा). परंतु गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची कामगिरी पूर्वीसारखी दिसत नसल्याने कदाचित सर्वसामान्य गुंतवणूकदाराला हा प्रश्न पडेल की यापुढे बाजार पडले तर ‘एसआयपी’ चालू ठेवायची की बंद करायची. त्यात ज्या गुंतवणूकदाराने पहिल्यांदाच म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात नुकतेच पैसे घातले असतील तर असे प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.

या प्रश्नाचे उत्तर द्यायच्या आधी हे उदाहरण  पाहू. या उदाहरणातून हे स्पष्ट होत आहे की, दीर्घ कालावधीतील गुंतवणुकीमधून जास्त चांगले परतावे मिळतात. २००० ते २०१८ या १८ वर्ष सातत्याने केलेल्या गुंतवणुकीदरम्यान २००० सालचा डॉटकॉम बुडबुडा, २००८ सालचे आर्थिक संकट – हे स्पीड ब्रेकर लागले. परंतु शिस्तबद्ध गुंतवणूकदाराला त्याच्या चिकाटीचा फायदा झाला. शिवाय गुंतवणुकीचे चक्रवाढीचे फायदे हे ७-८ वर्षांनंतर दिसू लागतात हेसुद्धा वरील उदाहरणातून स्पष्ट होते.


तर आता तुम्हाला ‘एसआयपी’ चालू ठेवा असं वेगळे सांगायला हवे का? फक्त एक लक्षात असू द्या की, नजीकच्या काळात लागणारा पैसा कमी जोखमीच्या पर्यायामध्ये गुंतवा. नको तिथे जास्त जोखीम घेऊ  नका.

सूचना: हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

*  या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.

*  सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.

*  यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले  जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.

*  गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.

First Published on February 26, 2018 5:50 am

Web Title: trupti rane article about investment in mutual fund