05 April 2020

News Flash

नेटकरांची संख्या ३५ कोटींवर!

सहा महिन्यांत ५.२० कोटींची नव्याने भर वाढत्या स्मार्टफोनमुळे देशातील इंटरनेटधारकांची संख्येत झपाटय़ाने वाढत होत असून जून २०१५ अखेर भारतातील नेटकरांची संख्या एकूण ३५.२० कोटी झाली

सहा महिन्यांत ५.२० कोटींची नव्याने भर

वाढत्या स्मार्टफोनमुळे देशातील इंटरनेटधारकांची संख्येत झपाटय़ाने वाढत होत असून जून २०१५ अखेर भारतातील नेटकरांची संख्या एकूण ३५.२० कोटी झाली आहे. २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यांत ५.२० कोटी नवीन नेटकरांची यात भर पडली आहे.
इंटरनेट तसेच मोबाइल क्षेत्रातील ‘इंटरनेट अ‍ॅन्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयएएमएआय) ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण इंटरनेटधारकांपैकी ६० टक्के वापरकर्ते हे मोबाइलच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान वापरतात. मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जून २०१५ अखेर २१.३० कोटी नोंदली गेली आहे.
ऑक्टोबर २०१४ मधील २७.८० कोटी इंटरनेटधारकांच्या तुलनेत यंदा त्यात २६ टक्के वाढ झाली आहे. तर मोबाइल इंटरनेटधारकांचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढून १५.९० कोटी झाले आहे.
भारतात दशकभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या एक कोटींवरून १० कोटींपर्यंत वाढली. तर पुढील तीन वर्षांत ती दुप्पट, १० कोटींवरून २० कोटी झाली. आणखी १० कोटी धारक नोंदविण्यास या क्षेत्राला केवळ एकच वर्ष लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2015 8:56 am

Web Title: 35 crores internet users in india
टॅग Business News
Next Stories
1 दूरध्वनीधारकांची संख्या १००.७० कोटी
2 कॉसमॉस बँकेच्या व्यावसायिक, औषध विक्रेत्यांसाठी कर्ज योजना
3 भांडवली बाजार आणखी खोलात; ‘सेन्सेक्स’चा नवीन वार्षिक तळ
Just Now!
X