आगामी २०१३-१४ आर्थिक वर्षांतील वित्तीय तुटीचे ४.८ टक्क्यांचे उद्दिष्ट खर्चामध्ये कोणतीही कपात न करता पूर्ण करणे सहज शक्य आहे, अशी सरकारला पूर्ण खात्री आहे असे अर्थमंत्री चिदम्बरम यांनी गुरुवारी येथे सांगितल़े महसुलात वाढ करण्याचे प्रयत्न करून, खर्च कमी न करता केवळ खर्चावर नियंत्रण ठेवून आपण वित्तीय तूट कमी करण्याचे केवळ उद्दिष्टच गाठू असे नाही, तर त्यापेक्षाही चांगले करू शकू, असेही चिदम्बरम यांनी या वेळी सांगितल़े  गेल्या आर्थिक वर्षांत ५.२ टक्क्यांपर्यंतच वित्तीय तूट कमी करता येईल, असे वाटले होते; परंतु उत्तरार्धात ४.९ टक्के वित्तीय तुटीचे उद्दिष्ट गाठण्यात आले होत़े  
त्यामुळे गेल्या वर्षीच ४.९ पर्यंतचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने येत्या वर्षांत ४.८ चे उद्दिष्ट गाठणे अगदी सहज शक्य आह़े  त्यापेक्षा अधिकही गाठणे शक्य आहे, असे चिदम्बरम म्हणाल़े  २०१६-१७ पर्यंत ही तूट ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाल़े