News Flash

अल्केम, लाल पॅथलॅब्स समभागांचे २३ डिसेंबरला बाजारात पदार्पण

१,०५० रुपये वितरण किंमत निश्चित केलेल्या अल्केम लॅबोरेटरीजने भागविक्रीतून १,३५० कोटी रुपये उभारले.

अलीकडच्या काळात प्रारंभिक खुल्या भागविक्रीत घवघवीत यश मिळविलेल्या अल्केम लॅबोरेटरीज आणि डॉ. लाल पॅथलॅब्स या कंपन्यांच्या समभागांची येत्या २३ डिसेंबरला बाजारात नोंदणी होणार आहे. अनुक्रमे औषधनिर्माण व आरोग्यनिदान क्षेत्रातील या कंपन्यांच्या समभागांची सूचिबद्धता मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात होईल.
प्रति समभाग १,०५० रुपये वितरण किंमत निश्चित केलेल्या अल्केम लॅबोरेटरीजने भागविक्रीतून १,३५० कोटी रुपये उभारले. या भागविक्रीला गुंतवणूकदारांकडून ४४.२९ पटीने भरणा झाला, तर डॉ. लाल पॅथलॅब्सच्या भागविक्रीला ३३.४१ पट प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने प्रति समभाग ५४० ते ५५० रुपये किंमतीत (व्यक्तिगत गुंतवणूकदारांना १५ रु. सवलतीसह) भागविक्री करून ६३८ कोटी रुपये उभारले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:49 am

Web Title: alkem dr lal pathlabs to make stock market debut on december 23
टॅग : Stock Market
Next Stories
1 संरक्षण सामग्रीच्या देशांतर्गत निर्मितीचा रबर उद्योग मुख्य कणा’
2 कॅनबँक व्हेंचर कॅपिटल फंडाची ‘बायोनीड्स’मध्ये भांडवली गुंतवणूक
3 भारतात आता ‘रेलटेल’!
Just Now!
X