30 October 2020

News Flash

महिनाभरात जिओचं पाचवं मोठं डील; अमेरिकन कंपनी करणार ११ हजार ३६५ कोटींची गुंतवणूक

आशियाई कंपनीत केकेआरनं केलेली ही मोठी गुंतवणूक आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीत अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी केकेआरनं ११ हजार ३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओनं या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. केकेआर ११ हजार ३६५ कोटी रूपयांची गुंतवणूक करून जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

कोणत्याही आशियाई कंपनीत केकेआरनं केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी रूपये तर एन्टरप्राईझ व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे. या गुंतवणुकीसोबतच रिलायन्स जिओमध्ये महिनाभराच्या कालावधीत ७८ हजार ५६२ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. रिलायन्स जिओमध्ये महिन्याभरात करण्यात आलेली ही पाचवी गुंतवणूक आहे.

यापूर्वी रिलायन्स जिओमध्ये न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकनं ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत जनरल अटलांटिक जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. आशियाई कंपनीतील जनरल अटलांटिकची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं सांगण्यात आलं होतं.

सर्वप्रथम फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं ५,६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

केकेआरची मदत होणार – अंबानी

भारतीय डिजिटल इको प्रणालीत बदल करण्याच्या आमच्या प्रवासात केकेआर आमच्या सोबत असेल. हे सर्व भारतीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महत्त्वपूर्ण भागीदार होण्याचा केकेआरचा ट्रॅक रेकॉर्ड विलक्षण आहे. केकेआरचे जागतिक व्यासपीठ, उद्योगांची माहिती आणि परिचालनाचं कौशल्य जिओच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरेल,” अशी प्रतिक्रिया रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली.

जिओमुळे भारतात डिजिटल क्रांती – केकेआर

देशातील डिजिटल इको प्रणाली बदलण्याची क्षमता ठराविक कंपन्यांकडे असते. जिओ हे त्यापैकीच एक आहे. जिओ एक असा स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे जो भारतात डिजिटल क्रांती घडवत आहे. जिओचे जागतिक स्तरावरील इनोव्हेशन आणि उत्तम नेतृत्वामुळेच आम्ही कंपनीत गुंतवणूक करत आहोत, अशी माहिती केकेआरचे सहसंस्थापक हेनरी क्राविस यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 9:33 am

Web Title: american private equity company kkr to invest 11367 crore rupees in jio platform fifth deal in month jud 87
Next Stories
1 आरोग्यसेतू अ‍ॅपच्या माध्यमातून औषधांच्या ई-विक्रीला औषध विक्रेता संघटनेचा विरोध
2 पाच हजार वितरकांचा म्युच्युअल फंड व्यवसायाला रामराम!
3 करोनाकाळात बँक-ठेवींचा फुगवटा
Just Now!
X