वस्तू व सेवा करविषयक राज्यांच्या अर्थमंत्र्यांची कृती समितीचे अध्यक्ष म्हणून अमित मित्रा यांची नियुक्ती झाली आहे. पूर्वाश्रमीचे उद्योगपती मित्रा हे २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) दाखल झाले होते.

वस्तू व सेवा करासाठी केंद्र सरकार व राज्यांमधील संपर्क तसेच दोन पातळीवरील कर सामंजस्याकरिता ही समिती तयार करण्यात आली आहे. केरळाचे अर्थमंत्री के. एम. मणी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर या समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नोव्हेंबरपासून हे पद रिक्त होते. मित्रा हे ‘फिक्की’ या उद्योग संघटनेचे काही वर्षे सरचिटणीस होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे शासन स्थापित होताच ते या पक्षात जाऊन राज्याचे अर्थमंत्रीही बनले. मित्रा यांच्या रुपाने समितीवर चौथ्यांदा अध्यक्ष नेमण्यात आला आहे.