07 March 2021

News Flash

जानेवारीपासून ‘ऑडी’चीही दरवाढ!

बीएमडब्ल्यूपाठोपाठ ऑडी या जर्मन बनावटीच्या कंपनीनेही जानेवारी २०१४ पासून वाहनांच्या किमती वाढविण्याची घोषणा केली आहे. आलिशान प्रवासी

| November 29, 2013 06:47 am

बीएमडब्ल्यूपाठोपाठ ऑडी या जर्मन बनावटीच्या कंपनीनेही जानेवारी २०१४ पासून वाहनांच्या किमती वाढविण्याची घोषणा केली आहे. आलिशान प्रवासी वाहननिर्मिती क्षेत्रातील या कंपनीने ५ टक्क्यांपर्यंत किमती वाढविण्याचे ठरविले आहे. विद्यमान परिस्थितीत व्यवसाय टिकविण्यासाठी किमतवाढीवाचून पर्यायच नसल्याचे कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख जो किंग यांनी म्हटले आहे. कंपनी ए४, ए६, ए८, एस४, एस६ या सेदान; तर क्यू३, क्यू५ आणि क्यू७ ही स्पोर्ट युटिलिटी वाहने तयार करते. त्यांची किंमत २७.९३ लाख ते २.१४ कोटी रुपये आहे. जर्मनीच्याच बीएमडब्ल्यूनेही याच आठवडय़ात किंमतवाढीची घोषणा केली. यानुसार कंपनीच्या कार नव्या वर्षांत १० टक्क्यांपर्यंत महाग होणार आहेत. कंपनीने ऑगस्टमध्येही ५ टक्क्यांनी किमती वाढविल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 6:47 am

Web Title: audi set to raise prices by 3 5 per cent next year
Next Stories
1 तांत्रिक बिघाडामुळे मारुतीने दीड हजार मोटारी माघारी बोलावल्या
2 नव्या खासगी बँक स्पर्धेतून टाटा समूह बाहेर
3 स्टेट बँक लाच प्रकरण : सप्ताहअखेर अहवाल येणे अपेक्षित: टकरू
Just Now!
X