खेळत्या भांडवलाची गरज म्हणून आणि व्यवसायाच्या कक्षा विस्तारण्यासाठी उद्योगांनी बँकांकडून कर्ज घेणे वावगे नाही. परंतु सध्याच्या एकूण आर्थिक मरगळीच्या वातावरणात मोठे कर्जदायित्व असलेल्या कंपन्यांतील गुंतवणूक जोखमीची ठरते. विशेषत: विपरीत कर्ज/भागभांडवल (डेट/इक्विटी) गुणोत्तर म्हणजे भरणा झालेल्या भागभांडवलापेक्षा किती तरी अधिक हे कर्जाचा भार चढत जाणे म्हणजे सध्याच्या मंदीच्या वातावरणात कडेलोटाचेच लक्षण ठरते. कारण अशा कंपन्या जो काही नफा कमावतील तो सर्व कर्ज फेडण्यावर खर्ची पडेल आणि अर्थात भागधारकांना लाभांश वगैरे रूपाने मिळू शकणारा परतावा गिळंकृत केला जाईल. सध्याचे चढय़ा व्याजदराचे वातावरण पाहता अनेक कंपन्यांना कर्जफेड करताना नाकी नऊ येत आहे, तर मागणीचा अभाव व आर्थिक मलूलतेमुळे नफाक्षमतेलाही कात्री लागली आहे. म्हणजे घेतलेल्या कर्जाद्वारे व्यावसायिक कामगिरीत सुधारणा करणारा परिणाम दिसण्याऐवजी, मिळकतीलाच अधिकाधिक लगाम घातला जातो, अशा सापळ्यात या कंपन्या फसत चालल्या आहेत.
गेल्या वर्षभरात अशा कर्ज/भागभांडवल गुणोत्तर जोखमीचे असणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत सर्व गुंतवणूक विश्लेषकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अर्थात वर्षभरात या कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरीही याचा प्रत्यय देते. खाली दिलेल्या बँका वगळता कंपन्यांच्या सूचीतील बहुतांशांचे भाव त्यांच्या वर्षांतील नीचांक पातळीवर असून, वर्षभरात या कंपन्यांतील गुंतवणूक जबर नुकसानकारक ठरली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

* कर्ज/भांडवल गुणोत्तर हे ३१ मार्च २०१२ अखेर
* सद्य भाव हा ३१ जुलै २०१३ अखेर
* १ वर्ष परतावा हा ३० जुलै २०१२ रोजी गुंतवणूक केली असल्यास मिळू शकणारा परतावा आहे.
कर्ज/भांडवल गुणोत्तर = एकूण दायित्व भागिले भरणा झालेले भागभांडवल