मुंबई : थिंक फार्मा या वैद्यकीय क्षेत्रातील औषध निर्मितीतील अग्रणी कंपनीने संसर्गजन्य आजाराच्या पाश्र्वभूमीवर रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मापदंडावर औषधनिर्मिती केली आहे.

दिवसातून चार वेळा चार ते पाच तासांच्या अंतराने ५०० मिलीग्रॅमची एक गोळी चघळून घेण्याची सूचना असून गोळ्या २५च्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. या गोळ्यांचे उत्पादन भारतीय खाद्य सुरक्षा नोंदणी परवाना अंतर्गत केले आहे. नियमानुसार हर्बल घटकांचा वापर केला आहे. सर्व तपासणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून केल्याचे डॉ. मिलिंद घारपुरे यांनी सांगितले.

वायसीएम रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी यांनीदेखील या औषधांचा रुग्णांवर योग्य परिणाम होत असल्याचे नमूद केले. पुण्याच्या क्वेस्ट क्लिनिकल सर्विसेसच्या डॉ. हृषिकेश रांगणेकर यांनीही या औषधाचे सुपरिणाम आल्याचे म्हंटले आहे.

गोळ्यांच्या उपचारांचा कालावधी पाच दिवसांचा असून यातून संसर्गाचे प्रमाण सरासरी ७० टक्कय़ांनी कमी होते, असा दावा करण्यात आला आहे.

थिंकफार्माने रुग्णांना गोळ्या घेताना कुठल्याही प्रकारची वेगळी पथ्ये सांगितलेली  नाहीत. या गोळ्या आणि त्याद्वारे उपचार अठरा वर्षांवरील कोणालाही घेणे सुरक्षित आहे, असे थिंक फार्माने म्हटले आहे. भारतीय खाद्य सुरक्षा नोंदणी परवाना असलेले पॉली-हर्बल फॉम्र्युलाचा वापर, पाच दिवसाची उपचार पद्धत, तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होणे, रुग्ण बरे होण्याच्या वेग वाढून लवकर आराम वाटू लागणे, क्वालिटी ऑफ लाईफ सुधारत जाणे हे  थिंकक्युअरच्या २० उपचारांचे फायदे आहेत.