22 November 2017

News Flash

गुंतवणुकीची मूलभूत तत्वे

संपत्ती निर्मितीचा मूलभूत नियम म्हणजे वेगवेगळया मालमत्ता प्रकारांमधे गुंतवणूक करणे, ज्याला मालमत्ता विभागणी असेही

संदेश किरकिरे | Updated: November 28, 2012 10:11 AM

संपत्ती निर्मितीचा मूलभूत नियम म्हणजे वेगवेगळया मालमत्ता प्रकारांमधे गुंतवणूक करणे, ज्याला मालमत्ता विभागणी असेही म्हटले जाते. परंतु वेगवेगळया मालमत्तांमधे वेगवेगळया स्तरावरील धोके असतात आणि एखाद्या व्यक्तीने वेगवेगळया प्रकारांनी गुंतवणूक करुन या धोक्यांना सामोरे गेले पाहिजे.
एखाद्या तरुण व्यक्तीला पुढल्या दोन ते तीन वर्षांत घर खरेदी करायचे असेल. तर अशा वेळी त्याने जर आपली जास्त गुंतवणूक भागभांडवलात केली असेल तर त्याच्यासाठी ते धोकादायक ठरु शकते. म्हणूनच मालमत्ता विभागणीविषयी निर्णय घेतांना गुंतवणुकीची विभागणी भागभांडवल, कर्ज, स्थावर मालमत्ता आणि सोने अशा प्रकारांमधे प्रामुख्याने करता येऊ शकेल. या सर्वामधे सर्वात कमी धोका डेब्टमधे असतो, त्यानंतर सोने व स्थावर मालमत्ता व नंतर भागभांडवलात असतो.
जेव्हा एखादी व्यक्ती भागभांडवल खरेदी करते तेव्हा तो प्रत्यक्षात त्या व्यवसायाच्या मालकीचा काही भाग खरेदी करत असतो व म्हणूनच एखाद्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भागभांडवलाकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु भारतीय गुंतवणुकदार छोटय़ा मुदतीसाठीची गुंतवणूक म्हणून भागभांडवलाकडे पाहतात. दुय्यम भाग भांडवल बाजारपेठ विभागातील एकूण व्यवहारपकी ९०% व्यवहार अनुजात ठेव प्रकारात असतात व रोखीच्या १०% व्यवहारांपकी, ५% पेक्षा कमी व्यवहार पोचवणी प्रकारात असतात.
एखाद्या कंपनीविषयी ठराविक संशोधन म्हणजे गृहीतकांवर आधारित उत्पन्नाच्या मॉडेल्सद्वारे कंपनीच्या भविष्याची मोजणी करणे, जसे – कंपनीच्या प्रगतीचा अंदाज, कंपनी ज्या क्षेत्रात येते ते क्षेत्र व कंपनी, खर्चातील वाढ व त्या अनुषंगाने नफ्यातील वृद्धी.
येथे म्युच्युअल फंड मदतीला येतात. किरकोळ गुंतवणूकदार थेट गुंतवणूक करण्याऐवजी, अगदी छोटय़ा रकमेनेही गुंतवणूक सुरु करु शकतो. म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणुकीच्या साधनांद्वारे असलेला खरोखरच सामुहिक मार्ग आहे व त्यामुळे ते बाजारपेठेप्रमाणेच काम करतात. म्युच्युअल फंड मूलगामी बाजारपेठत उत्तम प्रकारे निर्मिती करू शकतात. जर मूलगामी बाजारपेठ नकारात्मक असेल (जसे – निफ्टी किंवा सेन्सेक्स) तर म्युच्युअल फंडांची कामगिरीही नकारात्मक असते. गुंतवणूकदारांना अगदी दिलासा वाटतो तो म्हणजे डेब्टमध्ये. येथे गुंतवणूकदार स्वत: जाऊन गुंतवणूक करतो आणि इतर प्रकारांच्या बाबतीत आपल्याला एखाद्या मध्यस्थाची गरज वाटते, जो तुमचे मन वळवून तुम्हाला गुंतवणूक करण्यास सांगेल. परंतु, डेब्टमधे इतरही गुंतवणुकीचे मार्ग आहेत जसे ऋणपत्र.
ऋणपत्रमधे कंपनीने जारी केलेल्या ठराविक मुदतीत व्याज मिळते. ऋणपत्र व रोखे यांच्याबाबतीतले धोके म्हणजे मुख्यत्वे कसूर हेच असतात. त्यामुळे यात इतर सहज उपलब्ध असणाऱ्या डेब्ट गुंतवणूक पर्यायांपेक्षा चांगला परतावा मिळतो. शिवाय, जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा रोखे किंवा ऋणपत्रांची किंमत वाढते; आणि जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा ऋणपत्रांची किंमत घसरते. डेब्ट म्युच्युअल फंडांचे अनेक प्रकार असून ते गुंतवणुकीचे क्षेत्र व धोक्याचा स्तरानुसार ठरतात. एखादी व्यक्ती अगदी कमी मुदतीसाठी म्हणजे अगदी एका दिवसासाठीसुद्धा गुंतवणूक करु शकते. त्याचप्रमाणे यात वर्षांसाठीही गुंतवणूक करता येते. एक वर्षांपेक्षाजास्त गुंतवणुकीची मुदत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन डेब्ट योजनांची शिफारस करण्यात येते.
डेब्ट मालमत्तेतील वाटप अनेक घटकांवर अवलंबून असते, परंतु त्यापकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोका-परतावा प्रोफाइल व गुंतवणूकदारांचे गुंतवणुकीचे क्षेत्र. गुंतवणूकदार चलनवाढीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या न्हासावर मात करण्यासाठी डेब्ट म्युच्युअल फंडांचा वापर करु शकतो. आपल्या गुंतवणुकीला सोपक्ष स्थर्य देण्यासाठीही डेब्ट गुंतवणुकीचा वापर केला जातो.
भागभांडवल, डेब्ट, सोने इत्यादींसारखे विविध मालमत्ताप्रकार वेगवेगळया व्यवसाय चक्रांमधे वेगवेगळया प्रकारे कार्य करतात. सध्या आपण ज्यातून जात आहोत त्या मंदीच्या काळात डेब्ट मालमत्ताप्रकार किंवा गुंतवणूक म्हणून सोने इतर प्रकारांपेक्षा उत्तम कामागिरी करतात. प्रगतीच्या काळात, (२००४ ते २००८) भागभांडवल व स्थावर मालमत्ता हे प्रकार इतरांपेक्षा उत्तम कामगिरी करतात. म्हणूनच सर्व मालमत्ता प्रकारांमधे विभागणी करणे महत्त्वाचे आहे.
यशस्वी गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम वाचवण्याची इच्छा; दीर्घकालीन गुंतवणूक योजना, सर्व मालमत्ता प्रकारांमधे गुंतवणूक करणे व व्यावसायिक आणि सक्षम पोर्टफोलियो व्यवस्थापन सेवांचा वापर करणे व व्यावसायिक आणि सक्षम पोर्टपोलियो व्यवस्थापन सेवांचा वापर करणे (मोठय़ा प्रमाणावर म्युच्युअल फंडांद्वारे) यांची गरज असते. म्हणूनच गुंतवणुकीचा शिस्तबद्ध व पद्धतशीर मार्ग जीवनातील इच्छा पूर्ण करण्यात अतिशय महत्त्वाचा ठरेल.    
लेखक ‘कोटक असेट मॅनेजमेन्ट’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

भारताचा आगामी काळ फार काही वाईट नाही. सरकार त्यांच्या परीने आर्थिक सुधारणांची प्रक्रिया राबवित आहे. देशात अनेक गोष्टींमध्ये (निर्णयांमध्ये) बदल होणे आवश्यकच आहे. एक उद्योगपती म्हणून आम्हालाही त्याबाबत आशा कायम आहे.
– रतन टाटा,
‘टाटा सन्स’चे अध्यक्ष (बुधवारी मेलबोर्न येथे)

First Published on November 28, 2012 10:11 am

Web Title: basic principal of investment
टॅग Arthsatta,Investment