प्राप्तिकर परतावा (रिटर्न्स) दाखल करण्याचा कालावधी नजीक येऊन ठेपला असताना, करदात्यांनी आपल्या कर निर्धारण क्षेत्राची खातरजमा करून घेऊन रिटर्न्स दाखल करावेत, असे आवाहन कर प्रशासनाने केले आहे.
प्राप्तिकर विभागाने अलीकडेच देशभरातील आपली कार्यालये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या फेरबदलांचा करदात्यांना ऐनवेळी मनस्ताप होऊ नये, यासाठी ही सूचना दिली गेली आहे. करदात्यांना त्यांचे नवीन कर निर्धारण क्षेत्र कोणते असेल याची माहिती देणारी यादी http://www.incometaxindia.gov. या अधिकृत संकेतस्थळावर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध केली जाणार आहे. आपल्या विद्यमान ‘पॅन’ क्रमांकाच्या आधारे करदात्यांना या यादीनुसार आपल्या नेमक्या क्षेत्राची चाचपणी करता येईल.  प्राप्तिकर विभागात अलीकडेच २०,७०० नवीन पदे भरण्यात आली, त्यांना सामावून कर निर्धारण (एओ) अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातही मोठे फेरबदल झाले आहेत.      

http://www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कर निर्धारण क्षेत्रांची यादी प्रसिद्ध होत आहे.