शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडला. मात्र, त्यानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. तसेच शुक्रवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांना तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी शेअर बाजाराचा निर्देशांक 793 अंकांनी घसरून 38,721 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 253 अंकांची घसरण झाली असून तो 11,559 अंकांवर बंद झाला. दरम्यान, शेअर बाजाराच्या 50 पैकी 44 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 50 पैकी 44 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

वाचा : https://www.loksatta.com/arthasatta/bse-share-market-down-trade-nse-bse-sensex-updates-jud-87-1926718/

दरम्यान, पीएनबी बँकेत भूषण पावर अँड स्टील या कंपनीचा 3 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा समोर आला आहे. पीएनबीने याची माहिती रिझर्व्ह बँकेलाही दिली आहे. हा घोटाळा समोर आल्यामुळे पीएनबीच्या शेअर्समध्येही 10 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारूती आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.