चिनी बांधकाम उपकरण उत्पादक कंपनी सॅनीने भारतात हरित ऊर्जा प्रकल्प साकारण्याचे निश्चित केले असून याकरिता ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीचा दक्षिण भारतातील हा प्रकल्प यासाठीची गुंतवणूक ही २०१६ ते २०२० पर्यंतसाठी असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी भारतात २गिगा व्ॉट क्षमतेचा हरित ऊर्जा प्रकल्प साकारणार आहे. याव्यतिरिक्तच्या प्रकल्पामार्फत १,००० रोजगार निर्माण होणार असल्याचे सॅनी समूहाचे अध्यक्ष लिआंग वेनगेन यांनी सांगितले. असून समूहाचे २००२ पासून भारतात अस्तित्व आहे. कंपनीने महाराष्ट्रातील पुण्यात २००९ मध्ये निर्मिती प्रकल्प साकारला.