रिझव्‍‌र्ह बँकेचे आर्थिक वर्ष १ जुल ते ३० जून असे असते. मागील आíथक वर्षांचा अहवाल रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केला. या अहवालात पहिल्यांदाच वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बचतीचा वेगळा अंतर्भाव करण्यात आला. देशात सत्तांतरासह वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत घडून आलेल्या बदलाचेही दृश्यरूप या अहवालाने पहिल्यांदाच सामोरे आणले आहे.  
मनमोहन इफेक्ट
वैयक्तिक गुंतवणूकदारांची बँक ठेवींना पसंती; म्युच्युअल फंड गुंतवणुकीला घरघर!
ल्ल दोलायमान अर्थव्यवस्थेत वैयक्तिक गुंतवणूकदारांची पसंती जास्त परंतु अशाश्वत परतावा देणाऱ्या शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा स्थिर उत्पन्न देणाऱ्या बँक ठेवींनाच असते, हा सिद्धांत पुन्हा एकदा रिझव्‍‌र्ह बँकेच्या वार्षकि अहवालातून पुढे आला आहे. आर्थिक वर्ष २०१४ मध्ये बँकांतील वैयक्तिक ठेवीदारांच्या ठेवी तब्बल एक लाख कोटींनी वाढल्याचे समोर आले आहे. वर्षभरात बँकांतील ठेवी वाढून ५.९१ लाख कोटींवरून ६.९१ लाख कोटींवर गेल्या आहेत व त्याच वेळी बँकांतील एकूण ठेवींच्या वैयक्तिक ठेवीदारांचे प्रमाण ५३ टक्क्यांवर पोहचले आहे. मागील आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेत वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बचतीत तब्बल ८.१९ लाख कोटी म्हणजे १३ टक्के वाढ झाली आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षांत ही वाढ ७.२२ लाख कोटी होती.
वैयक्तिक ठेवीदारांनी म्युच्युअल फंड (इक्विटी व डेट) योजनांपेक्षा पारंपरिक बचतीचे साधन समजल्या जाणाऱ्या बँक ठेवी पसंत केल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. मागील आíथक वर्षांत बँक ठेवीत वाढ होत असतानाच म्युच्युअल फंडात २१ हजार कोटींची घट झाली आहे. २०१२-१३ मध्ये ही घट ३५ हजार कोटींची होती.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांच्या बचतीच्या दरात घट होऊन हा दर ३०.१ टक्के इतका घसरला आहे. हा दर मागील १० वर्षांतील सर्वात कमी दर आहे. २०१२-१३ मध्ये हा दर ३१.३ टक्के होता.

मोदी इफेक्ट
एप्रिल-जून तिमाहीत एनएसईवरील  ‘ईटीएफ’ उलाढालीत दुपटीने वाढ
नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याची स्वप्ने दाखवून सत्तेवरची पकड मजबूत केल्यावरही सामान्यांसाठी प्रत्यक्षात सुदिन दूर असले तरी शेअर बाजारात व्यवहार होणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनांना अर्थात ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड- ईटीएफ’ना नक्कीच सुगी दिसली आहे. गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील गुंतवणुकीवर विश्वास वाढायला लागल्याने ईटीएफची चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीत उलाढाल दुपटीने वाढली आहे. नवीन सरकार सत्तेवर येऊन भारतीय अर्थव्यवस्थेस प्रतीक्षा असलेल्या अर्थ-सुधारणा सुकर होतील, या आशेवर प्रत्यक्ष सत्तांतर होण्याआधीच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी ईटीएफना पसंती दिली आहे.  मागील सरकारने चालू खात्यावरील तूट नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या समभागांचा सहभाग असलेला ‘सीपीएसई’ हा ईटीएफ मार्च महिन्यात गुंतवणूकदारांसाठी खुला केला. या वेगळ्या धाटणीच्या ईटीएफला गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. एप्रिल-जून या कालावधीत सोने व समभाग गुंतवणूक करणाऱ्या ईटीएफच्या व्यवहारांची दैनंदिन सरासरी ७४.०१ कोटी झाली. जानेवारी-मार्च या कालावधीत हीच सरासरी २८.२४ कोटी होती. जानेवारी-मार्च या कालावधीत ईटीएफमध्ये व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या ८३,२९४ होती. तर एप्रिल-जून या कालावधीत हीच संख्या एक लाख ४० हजारांवर पोहोचली. जुलअखेरीस दोन्ही बाजार मंचावर सूचिबद्ध असलेल्या ईटीएफची संख्या ४२ इतकी होती. यापकी सर्वात जास्त मालमत्ता ‘सीपीएसई’ या ईटीएफकडे आहे.