करोना व्हायरसमुळे मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळतोय. आज सुद्धा ही घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी तब्बल १७०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. २८,८७० अंकांवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४९८ अंकांनी कोसळून ८४६८ अंकांवर बंद झाला.
करोना व्हायरसमुळे आर्थिक विकासाला मोठा फटका बसला आहे. भारतच नव्हे, तर संपूर्ण जग आजाराबरोबर आलेल्या या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने सकारात्मक सुरुवात केली होती. पण दिवसअखेरपर्यंत ती सकारात्मकता टिकवून ठेवता आली नाही.
रोजच कोसळणाऱ्या शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले आहे. बँक आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. करोना व्हायरसचे संकट आधीपासूनच असताना कच्चा तेलाच्या दरातील विक्रमी घसरण हे सुद्धा शेअर बाजार कोसळण्याचे एक कारण आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 4:17 pm