28 November 2020

News Flash

यंदा धनोत्रयोदशीला २० हजार कोटींची सोने विक्री

धनोत्रयोदशीला ४० टन सोन्याची विक्री....

(संग्रहित छायाचित्र)

यंदा धनोत्रयोदशीला ग्राहकांनी मोठया प्रमाणात सोन्याची खरेदी केली. मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदा धनोत्रयोदशीला ३० टक्के जास्त सोन्याची विक्री झाली. ग्राहकांनी यंदाच्या धनोत्रयोदशीला २० हजार कोटीपर्यंत सोन्यांची खरेदी केली अशी माहिती आयबीजेए या ज्वेलर्सच्या संघटनेने दिली. IBJA च्या डाटानुसार, यंदा धनोत्रयोदशीला देशभरात ४० टन सोन्याची विक्री झाली. त्याची किंमत २० हजार कोटी आहे.

मागच्यावर्षी देशभरात १२ हजार कोटी रुपयाच्या सोन्याची विक्री झाली होती. यंदा हाच आकडा २० हजार कोटींच्या घरात आहे अशी माहिती IBJA चे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी आयएएनएसला दिली. “मागच्यावर्षी धनोत्रयोदशीला ३० टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा ४० टन सोन्याची विक्री झाली” असे मेहता म्हणाले.

मागच्यावर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के विक्री वाढली. सोन्याची किंमत ७० टक्क्याने वाढली असे त्यांनी सांगितले. “मागच्या आठ महिन्यात लॉकडाऊनमुळे ग्राहकांना सोने खरेदी करता आली नव्हती, त्यामुळे यंदा खरेदीत वाढ झाली” असे मेहता म्हणाले. “आता लग्नाचा मोसम सुरु होईल. लोक इतके महिने थांबले होते. आता धनोत्रयोदशीच्या निमित्ताने लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केली” असे मेहता यांनी सांगितले. प्रतितोळा ५६ हजारापर्यंत पोहोचलेल्या सोन्याची किंमत आता थोडी कमी झाली आहे. शुक्रवारी प्रतितोळा १० ग्रॅम सोन्याची किंमत ५० हजारच्या पुढे होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 4:25 pm

Web Title: diwali gold worth twenty thousand crore sold on dhanteras says jewellers body dmp 82
Next Stories
1 ‘दिवाळी भेटी’च्या परडीत यंदा आरोग्य-धनसंपदा!
2 बाजार-साप्ताहिकी : नफा वसुलीचा मुहूर्त!
3 बिल गेट्स यांच्या व्हेंचरमध्ये मुकेश अंबानी करणार ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
Just Now!
X