06 August 2020

News Flash

दसरा वाहन कंपन्यांच्या पथ्यावर

कंपनीच्या नोंदणी आणि निर्यातीत यंदा अनुक्रमे १८ व १५ टक्के वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सप्टेंबरमध्ये विक्रीत उल्लेखनीय वाढ; ग्राहकांची सण समारंभापूर्वीची खरेदी

वस्तू व सेवा करानंतर लागू झालेला वाढीव अधिभार व परिणामी वाढवावे लागलेल्या वाहनांच्या किंमतीनंतरही गेल्या महिन्यात कंपन्यांच्या विक्रीत वाढ नोंदली गेली आहे. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर देशातील वाहन कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये वाढीव विक्री वाढ नोंदविली आहे.

वाहन खरेदीसाठी एक उल्लेखनीय मुहूर्त मानले जाणाऱ्या ३० सप्टेंबर रोजीअखेर कंपन्यांनी त्यांचा गेल्या महिन्याभरातील विक्री प्रवास स्पष्ट केला. यामध्ये अनेक कंपन्यांना वाढीव विक्री नोंदविता आली.  आर्थिक मंदी आणि वाढीव अधिभार व वाढत्या किंमतीचे चित्र असूनही कंपन्यांनी यंदा तुलनेत अधिक वाहन विक्री राखली.

भारतीय वाहन क्षेत्रातील आघाडीच्या सहापैकी चार कंपन्यांनी तर विक्रीतील दुहेरी अंकवाढ राखली.

वस्तू व सेवा करानंतर वाढीव अधिभारापोटी कंपन्यांना त्यांची वाहने २ ते ७ टक्क्य़ांपर्यंत महाग करावी लागली होती. छोटय़ा प्रवासी कार वगळता यामुळे इतर जवळपास सर्वच गटातील वाहनांच्या किंमती वाढल्या होत्या.

प्रवासी कार बाजारपेठेत निम्मा हिस्सा राखणाऱ्या मारुती सुझुकीने ९.३ टक्के वाढ नोंदविताना सप्टेंबरमध्ये १.६३ लाखांहून अधिख वाहने सप्टेंबरमध्ये विकली. कंपनीच्या नोंदणी आणि निर्यातीत यंदा अनुक्रमे १८ व १५ टक्के वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ह्य़ुंदाई मोटर इंडियाने सप्टेंबरमध्ये ५०,००० वाहने विकताना विक्री वाढ राखली आहे. कंपनीने नव्याने सादर केलेल्या व्हर्ना या सेदान श्रेणीतील कारची विक्री १७ टक्क्य़ांनी वाढली आहे.

टाटा मोटर्सची विक्री १८ टक्क्य़ांनी वाढली आहे. कंपनीच्या नवागत नेक्सॉन या कॉम्पॅक्ट कारला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. कंपनीने नोव्हेंबर २०१२ नंतर यंदा प्रथमच सर्वाधिक मासिक वाहन विक्री नोंदविली आहे. कंपनीने गेल्या वर्षभरात प्रवासी वाहन क्षेत्रात नवीन उत्पादने सादर केली व त्याला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जपानी होंडाच्या विक्रीत २१ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या गेल्या महिन्यातील १८,२५७ चारचाकी वाहनांची विक्री झाली. तर टोयोटा किलरेस्करची वाहन विक्री यंदा अवघी २.२ टक्क्य़ांनी वाढली आहे.

जर्मनीच्या फोक्सव्ॉगनची विक्री यंदा १७ टक्क्य़ांनी वाढून ४,६०३ वाहने झाली आहे. वर्षभरापूर्वी कंपनीने याच कालावधीत ३,०३९ वाहने विकली होती.

दुचाकीमध्ये रॉयल एनफिल्डची विक्री २२ टक्क्य़ांनी वाढली आहे. कंपनीने ६९,३९३ दुचाकी गेल्या महिन्यात विकल्या. तर याच गटातील बजाज ऑटोने गेल्या दिड वर्षांतील सर्वोत्तम विक्री नोंदविताना सप्टेंबरमध्ये १४ टक्के वाढ राखली आहे. कंपनीने या दरम्यान ४.२८ लाख वाहने विकली. कंपनीची ही मार्च २०१६ नंतरची सर्वोत्तम दुचाकी विक्री आहे. त्याचबरोबर कंपनीच्या व्यापारी गटातील वाहनांनाही यंदा प्रतिसाद लाभला आहे. कंपनीने ३२ टक्के वाढीसह ५९,०७४ वाहने या गटातील विकली आहेत. कंपनीच्या निर्यातीतही गेल्या महिन्यात ११ टक्के वाढ नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये सुझुकी मोटरसायकलची वाहन विक्री ५०,७८५ झाली आहे. कंपनीने वार्षिक तुलनेत ३२.९९ टक्के वाढ नोंदविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2017 3:06 am

Web Title: dussehra 2017 vehicle selling gst
Next Stories
1 आयुसंरक्षण संरक्षण देण्यास विसरू नका!
2 आयसीआयसीआय प्रु. बॅलन्स फंडाला ‘क्रिसिल’चे सर्वोच्च मानांकन
3 ‘जीएसटी’बाबत उद्योजक, निर्यातदारांचा तक्रारींचा पाढा
Just Now!
X