राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था कर-एलबीटी रद्द करण्यात येईल, असे आश्वासन  भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यातील लघुउद्योजकांना दिले.
‘महाराष्ट्र लघू व मध्यम उद्योग’ (एमएसएमईएस)च्या पाचव्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते नुकतेच वांद्रे येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा’चे अध्यक्ष कमांडर दीपक नाईक, उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर, ‘आयईएस’चे अध्यक्ष सतीश लोटलीकर तसेच लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजक या वेळी उपस्थित होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर संभाव्य सरकारमध्ये निर्णयप्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा धोरण लकवा राहणार नाही, तसेच आमचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त असेल, असे तावडे यांनी या वेळी सांगितले.