27 February 2021

News Flash

चार प्रमुख बँकांच्या सहाय्यानं आजपासून WhatsApp पेमेंट सुविधेला सुरूवात

आजपासून देशभरात सेवेला सुरूवात

मेसेजिंग अॅप WhatsApp नं भारतात आजपासून आपल्या पेमेंट सुविधेला सुरूवात केली आहे. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक या चार बँकांच्या मदतीनं WhatsApp नं ही सुविधा सुरू केली आहे. सध्या देशातील २ कोटी युझर्सना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर WhatsApp च्या पेमेंट सुविधेला नोव्हेंबर महिन्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं (NPCI) १६० बँकांच्या मदतीनं यूपीआयसह लाईव्ह जाण्याची परवानगी दिली होती. WhatsApp च्या माध्यमातून आता संदेशांसह पैसेदेखील पाठवता येणार आहेत.

WhatsApp च्या माध्यमातून आता आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सुरक्षितरित्या पैसे पाठवता येणार आहेत. तसंच रोख रकमेशिवाय तसंच कोणत्याही बँकेत न जाता WhatsApp च्या माध्यमातून पैसे देऊन वस्तू विकत घेताना येणार असल्याचं कंपनीनं सांगितलं.

WhatsApp पे ही सुविधा, गुगल पे, फोन पे, भीम आणि अन्य बँकांच्या अॅपप्रमाणेच युपीआयद्वारे कार्यरत आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीला वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. युझर्सना थेट आपल्या बँक खात्यातून पैसे देता येणार आहेत. जेव्हा एखादा युझर या सेवेसाठी नोंदणी करेल तेव्हा WhatsApp द्वारे त्याचा एक आयडी तयार करण्यात येईल. अॅपच्या पेमेंट्स सेक्शनमध्ये जाऊन हा आयडीदेखील पाहता येऊ शकतो. WhatsApp Payments द्वारे ज्या व्यक्तीकडे युपीआय आहे त्यांना पैसे पाठवता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 4:32 pm

Web Title: facebook fuel for india whatsapp payments upi based service live from today sbi hdfc icici axis bank jud 87
Next Stories
1 Blockbuster IPO : तीन दिवसांत गुंतवणुकदार मालामाल, बर्गर किंगमध्ये पुन्हा अपर सर्किट
2 ‘एसआयपी’कडे पाठ!
3 सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रम कायम; प्रमुख निर्देशांकात किरकोळ वाढ
Just Now!
X