27 May 2020

News Flash

‘बीएसएनएल-एमटीएनएल’ला अखेर टाळे ठोकणार

उभय कंपन्यांमध्ये १.६५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अर्थ खात्याची सरकारला स्पष्ट सूचना

नवी दिल्ली : आर्थिक विवंचनेपोटी कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ न शकलेल्या सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंदच करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी ७४,००० कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) वर ९५,००० कोटी रुपयांचा अर्थभार आहे. उभय कंपन्यांमध्ये १.६५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावही बारगळला आहे.सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंद करणे फारसे आर्थिक नुकसानीचे ठरणार नाही, असे केंद्रीय अर्थ खात्याचे म्हणणे आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 3:00 am

Web Title: finance ministry clear to lock bsnl mtnl telecom companies zws 70
Next Stories
1 सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात वर्षभरात एक-अंकी वाढ!
2 ‘मारुती’कडून सलग आठव्या महिन्यांत उत्पादन कपात
3 बँकेतील एक लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण जागतिक तुलनेत सर्वात अपुरे!
Just Now!
X