इतरांप्रमाणेच तुम्हीही अतिशय खास आहात. – डॉ. सुस

सुस यांच्या या शब्दांचे महत्त्व आजच्या काळात तंतोतंत खरे आहे. विशेष अनुभव देण्यासाठी आणि तातडीने समाधान देणारी उत्पादने हवी असलेल्यांसाठी तशी उत्पादने तयार करण्यासाठी कंपन्या काम करत असल्याचे सर्व श्रेणींमध्ये दिसून येते. आज प्रत्येक बाबतीत पर्याय उपलब्ध आहेत. जसे प्रवासाचे निवडक अनुभव यापासून ते या ऑर्डर—इन, फूड—टेक स्टार्टअप्सना कशा प्रकारे करायचे इथपर्यंत आणि माझी याबद्दल काहीही तक्रार नाही!

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

एम्पथ्री डिझाइन हा आता संपूर्ण विमा क्षेत्राचाही भाग झाला आहे आणि उत्पादनांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही त्याचा समावेश झाला आहे. परंतु, ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्याची पद्धत या क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात दिसू लागली असली तरी भारतीयांमध्ये विमा या संकल्पनेविषयी भीती घालणारी मानसिकता अजूनही कायम आहे.

विम्याविषयीचे पूर्वग्रह ग्राहकांच्या प्रकारावर अधिक अवलंबून असतात आणि त्याचा त्यांच्या वयाशी काहीही संबंध नसतो, हे माझ्या बऱ्यापैकी दीर्घ अनुभवातून लक्षात आले आहे. या विचारांचा संबंध ग्राहकांना असलेले ज्ञान व त्यांना असलेले अनुभव यांच्याशी निगडित असतो. माझा हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी काही ‘ग्राहक श्रेणीं’ची यादी तयार केली आहे.

नवखे : या ग्राहकांसाठी आर्थिक नियोजन ही संकल्पना पूर्णत: नवी असते व त्यांचा याच्याशी कधी संबंधच आलेला नसतो. त्यांना आर्थिक बाबतीत काहीसे स्वातंत्र्य असले तरी आर्थिक बाबींचे नियोजन करण्याची संकल्पना त्यांना माहीत नसते अशा व्यक्ती नव्यानेच कमवायला लागलेल्या असतील, असे नाही.

संशयखोर : या व्यक्तींना कायमस्वरूपी संशय असतो. त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारच्या लाभांचा अनुभव घेतलेला नसतो. त्यामुळेच कदाचित त्यांची विश्वास ठेवण्याची तयारी नसते.

वरवर विचार करणारे : हे ग्राहक कायम प्रयोग करत असतात. आज एका विमा कंपनीकडून योजना घेतात.  उद्या दुसऱ्या योजनेचे लाभ अनुभवण्यासाठी ते कधीही पुरेशा कालावधीपर्यंत बांधिलकी जपत नाहीत किंवा योजना टिकवून ठेवत नाहीत.

नवे : अशा ग्राहकांचे मित्र किंवा कुटुंबीय त्यांच्यासाठी विमा योजना खरेदी करतात किंवा कर्मचाऱ्याने काही प्रमाणात विमाकवच दिलेले असते. नवख्या ग्राहकांना विमा किंवा अन्य आर्थिक साधनांची थोडीफार ओळख असते. या व्यक्तींनी स्वत:हून वापर केलेला नसतो. मात्र साधारपणे त्यांना विमा म्हणजे काय याची कल्पना असते आणि त्यांनी स्वत:हून त्याचे फायदे अनुभवलेले नसतात.

स्थिर : हे ग्राहक विमा पूर्णत: जाणतात आणि त्यामुळे त्यांचा विम्यावर विश्वास असतो. विमा हा एकदाच करण्याचा व्यवहार नसून तो एक करार आहे. ज्यामध्ये विमा कंपनीने काही आश्वासने दिली असतील तर आपण त्या कंपनीचे ग्राहक आहोत हे या ग्राहकांना माहीत असते. त्यामुळे हे ग्राहक योजनेतील अटी पाळतात व सातत्य राखतात.

अनुभवी : अतिशय अनुभवी व्यक्ती, जिला सर्व माहिती असतेच; शिवाय तिने विम्याच्या दाव्याची पूर्तता करून त्याद्वारे एक संपूर्ण च  अनुभवलेले असते. जसे की – योजनेची मुदतपूर्ती किंवा लाभार्थी म्हणून.

वरीलपैकी कोणती व्यक्ती तुमच्यासारखी आहे, असे तुम्हाला वाटते?

शेवटच्या दोन प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये तुम्ही स्वत:ला पाहात नसाल तर अनुभवींना कशामुळे सर्व माहिती असते आणि स्थिर असलेले कशामुळे स्थिर राहतात याची माहिती तुम्ही करून घ्यायला हवी, असे वाटते.

कदाचित, विम्याचे परस्पर करारासारखे स्वरूप समजून घेण्यापासून सुरुवात करावी तसेच शेवटच्या दोन प्रकारांनी जाणले आहेत त्याप्रमाणे लाभ जाणून घ्यावेत. तुमच्या ओळखींमध्ये अनुभवी व स्थिर ग्राहक आहेत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी आर्थिक ज्ञान कुठून मिळवले ते समजून घेण्यापासून सुरुवात करू शकाल. तुम्ही नवखे असाल तर तुम्ही अगोदरच सुरुवात केलेली आहे. योजना घ्या, त्यांचा अभ्यास करा आणि त्या पूर्णपणे, सर्व संकल्पनांसह समजून घ्या.

‘माणसाला मृत्यूचे भय नसावे, तर त्याला जगण्यास कधीच सुरुवात न करण्याचे भय असायला हवे’, असे महान रोमन सम्राट मार्कस ऑरेलिस याने म्हटले आहे आणि माझेही हेच मत आहे.

संभाव्य प्रतिकूल स्थिती किंवा जीवनशैलीतील अपेक्षित बदल (कुटुंबाची वाढ, निवृत्ती, वगैरे) यांचा सामना करण्यासाठी नियोजन केलेले असेल; तसेच मृत्यूबाबतचेही नियोजन केलेले असेल तर कोणालाही निराश व्हावे लागणार नाही. व्यक्ती आपल्या गरजा व उद्दिष्टे यानुसार नियोजन करते. नियोजनाचा कालावधी, वय, परिस्थिती, जीवनातील टप्पा व जोखीम घेण्याची क्षमता यांचा परिणाम व्यक्तीच्या पोर्टफोलिओवर होतो.

स्वत:ला, तुमच्या नियोजनातील उत्पादनांतून मिळणाऱ्या लाभांना ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली की, आम्हाला एका बाबीचे समाधान वाटेल.

आणि ते म्हणजे ही उत्पादने म्हणजे खात्रीशीर उत्पन्न देणारी व त्यामुळे जीवनातील अनुश्चिततेला संरक्षण देणारी प्युअर—रिस्क पॉलिसी (उदा. एंडोमेंट, मनी—बॅक किंवा अन्य पारंपरिक प्लान) किंवा मृत्यू या घटनेला संरक्षण देण्याच्या पलीकडे जाऊन जीवनभरासाठी बचत संचयित करण्यासाठी तयार केलेली युनिट—लिंक्ड असू शकतात.

तुमच्या आर्थिक गरजा तुमच्या जीवनातील टप्प्यानुसार व जोखीम घेण्याच्या तुमच्या तयारीनुसार वेगळ्या आहेत, हे तुमच्या लक्षात आले की तुमची स्वत:ची आर्थिक शिस्त बसेल.

लेखिका इंडियाफर्स्ट लाइफ इन्सुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.