News Flash

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा महिन्याचा पगार ₹ १ अब्ज

कंपनीच्या उत्पादन विक्रीत वाढ

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई. (संग्रहित)

गुगलचे सीईओ (google CEO) सुंदर पिचाई यांना गेल्या वर्षी वेतन आणि अन्य रक्कम मिळून तब्बल २०० मिलियन डॉलर (१२.८५ अब्ज रुपये) इतके वेतन मिळाले आहे. सुंदर पिचाई जगातील सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती बनले आहेत. ते प्रतिमहिना सरासरी १ अब्ज वेतन घेतात. ४४ वर्षांच्या सुंदर पिचाई यांना २०१५ च्या तुलनेत २०१६ या वर्षी मिळालेला पगार दुप्पट आहे. गेल्या वर्षी पिचाई यांना ६.५ लाख अमेरिकन डॉलर इतके वेतन मिळाले होते. २०१५ मध्ये त्यांना गुगलने ६.५२ लाख अमेरिकन डॉलर वेतन दिले होते.

अनेक वर्षांपासून कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी सोपवली होती. २०१६ मध्ये त्यांना १९८.७ मिलियन डॉलर (अंदाजे १२.७७ अब्ज रुपये) मूल्याचे कंपनीचे शेअर्स मिळाले होते. २०१५ च्या तुलनेत ते दुप्पट आहेत. २०१५ मध्ये कंपनीने त्यांना ९९.८ मिलियन अमेरिकन डॉलरचे (अंदाजे ६.४१ अब्ज रुपये) प्रतिबंधित स्टॉक दिले होते. सीएनएनच्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांची सीईओपदावर बढती तसेच अनेक उत्पादने आणि त्यांचे यशस्वी लॉन्चिंग केल्यामुळेच गगुलच्या वेतनवृद्धी समितीने त्यांना जबरदस्त वेतन दिले आहे. गुगलचे सहसंस्थापक आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज सध्या अल्फाबेट या नवीन कंपनीच्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करत आहेत. वृत्तानुसार, पिचाई यांच्या नेतृत्त्वात प्रमुख जाहिराती आणि यूट्युबच्या माध्यमातून गुगलच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. तसेच कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. २०१६ मध्ये गुगलने नवे स्मार्टफोन, व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, राउटर आणि व्हाईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर बाजारात आणले होते. या उत्पादनांतून कंपनीला मोठा फायदा झाला होता. मसलन हार्डवेअर आणि क्लाउड सर्व्हिसेसच्या माध्यमातून तिमाहित तब्बल ३.१ अब्ज अमेरिकन डॉलर (अंदाजे १९९ अब्ज रुपये) इतकी कमाई झाली होती. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पटीने वाढली आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2017 1:28 pm

Web Title: google ceo sundar pichai salary nearly 200 million us dollar last year
Next Stories
1 डोकोमोप्रकरणी टाटांना दिलासा
2 ‘जीएसटी’ दर भीतीदायकनसतील!
3 फिटे अंधाराचे जाळे वाहे तेजीचा प्रकाश!
Just Now!
X