सॅमसंगच्या लोकप्रिय स्मार्टफोन श्रेणीतील गॅलेक्सीचा ग्रॅण्ड२ हा डय़ुएल सिमवर चालणारा नवा फोन अभिनेत्री हुमा कुरेशी हिने सोमवारी मुंबईत सादर केला. ग्रॅण्ड १ च्या तुलनेत ‘क्लब सॅमसंग’ ही ४ लाख गाणी, ५ हजार चित्रपट, ५०० गिगीज आणि लाइव्ह टीव्हीवर ९० हून अधिक चॅनल्सची पर्वणी हे नव्या ग्रॅण्डचे वैशिष्टय़ ठरावे.
लक्षात घ्यावयाच्या बाबी..
* किंमत : २२,९९० ते २४,९९० रुपये
* सोय : दुहेरी सिम कार्ड
* उपलब्धता : जानेवारी २०१४ पासून
* अ‍ॅण्ड्रॉइड : ४.३ जेली बिन
* डिस्प्ले : ५.२५ इंच एचडी टीएफटी
* रिझोल्युशन : ७२० बाय १२८० पिक्सेल
* कॅमेरा : ८ मेगा पिक्सेल रिअर व १.९ मेगा पिक्सेल फ्रन्ट
* जाडी : ८.९ मिमी व वजन : १६३ ग्रॅम
* मेमरी : ८ जीबी बिल्ट इन व ६४ जीबी मायक्रो एसडीद्वारे विस्तारित
* हॅण्डसेट रंग : काळा, गुलाबी आणि पांढरा